agriculture news in Marathi, Geo-taging of seven thousand water resources in Chandrapur District, Maharashtra | Agrowon

सात हजार जलस्रोतांचे होणार चंद्रपूर जिल्ह्यात 'जिओ टॅगिंग'

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

चंद्रपूर ः ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या स्रोतांचे सॅटेलाईट टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सात हजारांपेक्षा अधिक स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वचछता मिशन कक्षाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्व्हेक्षण कार्यक्रम जैविक तपासणी अभियान राबविल्या जाते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सुमारे ८ हजार जलस्रोत आहेत. या सर्व स्रोतांची तपासणी या अभियानाअंतर्गत केली जाणार आहे. या अभियानाची सुरवात मंगळवार (ता. १) पासून झाली.

चंद्रपूर ः ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या स्रोतांचे सॅटेलाईट टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सात हजारांपेक्षा अधिक स्रोतांचे पाणी नमुने गोळा करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वचछता मिशन कक्षाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आणि नंतर स्वच्छता सर्व्हेक्षण कार्यक्रम जैविक तपासणी अभियान राबविल्या जाते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सुमारे ८ हजार जलस्रोत आहेत. या सर्व स्रोतांची तपासणी या अभियानाअंतर्गत केली जाणार आहे. या अभियानाची सुरवात मंगळवार (ता. १) पासून झाली.

रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात १०० टक्‍के पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य सहायकांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाईल ॲपव्दारे गोळा करावयाचे आहेत. 

या पाणी नमुन्याची रासायनिक तपासणी, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणांच्या उपविभागीय प्रयोगशाळांतून करण्यात येणार आहे. या अभियानाबरोबरच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्व्हेक्षण १ ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत आरोग्य विभागाकडून केल्या जाईल. त्याकरिता प्रपत्र अ, ब, क संबंधीत आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरविण्यत आले असून त्याव्दारे स्रोतांचा परिसर, बोअरवेलमधील गळती, पाणी शुध्दीकरणबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखमीप्रमाणे ग्रामपंचायतीला पाणी गुणवत्तेविषयी जोखीम निश्चि‍त करण्यात येणार आहे. त्या आधारे ग्रामपंचायतींना लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे. 

असे होते टॅगिंग
स्रोतांच्या १७ मिटर परिसरात गेल्यावर ॲप सुरू करून त्याव्दारे स्रोत जिओ टॅग केल्या जाते. त्यानंतर छायाचित्रासह नमुना घेतला जातो. याव्दारे जिल्ह्यातील पाणीसाठ्याची एकंदरीत स्थिती कळण्यास मदत होते. पाण्याची तपासणीदेखील यातून शक्‍य होत असल्याने दूषित पाण्याचे स्रोत कळून आवश्‍यक त्या उपाययोजनाही करणे शक्‍य होते.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...