काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकन

काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे.
keshar
keshar

जम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. ‘‘केशरला मिळालेल्या मानांकनामुळे काश्‍मिरमधील ब्रॅन्ड जागतिक नकाशावर  आणण्याच्या दृष्टीने ही ऐतिहासिक पाऊल आहे,’’ असे उपराज्यपाल जी.सी. मुर्मू म्हणाले.  केंद्र सरकारने काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला नुकतेच भौगोलिक मानांकन (जीआय) जाहिर केले असून त्यांसंबंधीचे प्रमाणपत्र दिले आहे. नुकतेच उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.  पंपोर हे काश्‍मिरमधील केशर हब म्हणून ओळखले जाते. केंद्राने राष्ट्रीय केशर मिशन (एनएमएस) अंतर्गत यंदा विशेष प्रयत्न केल्याने येथे केशरचे बंपर उत्पादन होण्याची शक्यता आहे. ‘एनएमएस’ योजनेंतर्गत ३ हजार ७१५ हेक्टरवर केशरची लागवड पुन्हा आधिच्या पातळीवर आणण्यासाठी ४११ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. ‘‘काश्‍मिरी केशरमध्ये होणाऱ्या भेसळीला लगाम बसेल. तसेच शुध्द केशला चांगला दरही मिळेल. सध्या येथील २ हजार ५०० हेक्टरवर केशर पिकाचे पुर्नलागडीचे काम झाले आहे आणि यंदा बंपर उत्पादनाचा अंदाज आहे,’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

जगात वेगळी ओळख जगात केवळ काश्‍मिरमध्येच समुद्रसापाटीपासून १६०० मीटर उंचीवर केशरचे उत्पादन घेतले जाते. तसेच लांब आणि जाड, नैसर्गिक गडद लाल रंग, जास्त सुगंध, कडू चव आणि रासायनिक मुक्त प्रक्रिया या गुणवैशिष्ट्यांमुळे काश्‍मिरी केशरची वेगळी ओळख आहे. 

प्रितिक्रिया काश्‍मिरी केशरची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारे हे पहिले पाऊस आहे. ‘जीआय’मुळे केशरला आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त मागणी येईल. यातून शेतकऱ्यांना चांगला दरही मिळेल — गिरीश चंद्र मुर्मू, उपराज्यपाल, जम्मू आणि काश्‍मिर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com