agriculture news in Marathi geographical identification for Kashmiri Keshar Maharashtra | Agrowon

काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकन

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 जुलै 2020

 काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे.

जम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले आहे. ‘‘केशरला मिळालेल्या मानांकनामुळे काश्‍मिरमधील ब्रॅन्ड जागतिक नकाशावर  आणण्याच्या दृष्टीने ही ऐतिहासिक पाऊल आहे,’’ असे उपराज्यपाल जी.सी. मुर्मू म्हणाले. 

केंद्र सरकारने काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला नुकतेच भौगोलिक मानांकन (जीआय) जाहिर केले असून त्यांसंबंधीचे प्रमाणपत्र दिले आहे. नुकतेच उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली. 
पंपोर हे काश्‍मिरमधील केशर हब म्हणून ओळखले जाते. केंद्राने राष्ट्रीय केशर मिशन (एनएमएस) अंतर्गत यंदा विशेष प्रयत्न केल्याने येथे केशरचे बंपर उत्पादन होण्याची शक्यता आहे.

‘एनएमएस’ योजनेंतर्गत ३ हजार ७१५ हेक्टरवर केशरची लागवड पुन्हा आधिच्या पातळीवर आणण्यासाठी ४११ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. ‘‘काश्‍मिरी केशरमध्ये होणाऱ्या भेसळीला लगाम बसेल. तसेच शुध्द केशला चांगला दरही मिळेल. सध्या येथील २ हजार ५०० हेक्टरवर केशर पिकाचे पुर्नलागडीचे काम झाले आहे आणि यंदा बंपर उत्पादनाचा अंदाज आहे,’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

जगात वेगळी ओळख
जगात केवळ काश्‍मिरमध्येच समुद्रसापाटीपासून १६०० मीटर उंचीवर केशरचे उत्पादन घेतले जाते. तसेच लांब आणि जाड, नैसर्गिक गडद लाल रंग, जास्त सुगंध, कडू चव आणि रासायनिक मुक्त प्रक्रिया या गुणवैशिष्ट्यांमुळे काश्‍मिरी केशरची वेगळी ओळख आहे. 

प्रितिक्रिया
काश्‍मिरी केशरची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारे हे पहिले पाऊस आहे. ‘जीआय’मुळे केशरला आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त मागणी येईल. यातून शेतकऱ्यांना चांगला दरही मिळेल
— गिरीश चंद्र मुर्मू, उपराज्यपाल, जम्मू आणि काश्‍मिर


इतर अॅग्रोमनी
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...
गरज कांदा उत्पादक कंपन्यांची...मध्यमवर्गीय  ग्राहक आणि  उत्पादक शेतकरी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...