`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के जीएसटी ५ टक्के करा`

`प्रक्रिया उत्पादनांवरील जीएसटी ५ टक्के करा`
`प्रक्रिया उत्पादनांवरील जीएसटी ५ टक्के करा`

रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी तालुकास्तरावर संशोधन केंद्राची सुविधा उपलब्ध व्हावी. आंबा, कोकम, काजू, फणस इत्यादी हंगामी फळांपासून होणाऱ्या प्रक्रिया उत्पादनांवर १२ टक्के जीएसटी ५ टक्के करावा, अशी मागणी पावस येथील ज्येष्ठ आंबा बागायतदार जयंत देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

फडणवीस रत्नागिरी भेटीवेळी देसाई यांच्यासह उद्योजक आनंद देसाई, अमर देसाई उपस्थित होते. शेतकऱ्यांना संशोधन केंद्राद्वारे फवारणीयोग्य कीटकनाशक औषधांची योग्य माहिती मिळेल. हापूस आंबा, त्यापासून तयार व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रॉडक्टस् निर्यात करताना निर्यातदारांना जीआय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अनिवार्य करावे. निर्यातदारांना ओटीपी अथवा इतर माध्यमांतून शेतकऱ्यांशी बॅकवर्ड लिंकेज अनिवार्य करावे, अशी मागणी केली आहे.

निवेदनानुसार, कोकणामध्ये आंबा, कोकम, काजू, फणस या हंगामी फळांवर ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचे अर्थकारण अवलंबून आहे. फळांवर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योग येथे आहेत. त्यामुळे येथील जगप्रसिद्ध हापूस आंब्यापासून हंगामाव्यतिरिक्त प्रक्रिया उद्योगांपर्यंत चांगला फायदा होऊ लागला आहे. रत्नागिरी हापूस व देवगड हापूसला जीआय मानांकन मिळाल्याने, त्याचीही आंब्याच्या व त्यापासूनच्या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी मोठी मदत होणार आहे.

कोकणात ४८ लघू व मध्यम उद्योजक एकत्र येऊन आंबा प्रक्रिया समूह कार्यरत झाली आहे. कोकणात अजून १०० लहान-मोठे प्रक्रिया उद्योग आहेत. मागील युती सरकारच्या काळामध्ये कोकणातील फळांवर प्रक्रिया होणाऱ्या उत्पादनांवर विक्रीकरातून संपूर्ण माफी मिळाली. नंतर ५ व नंतर ६ टक्के व्हॅट आकारणी होऊ लागली. जीएसटी करप्रणालीमध्ये फळ उत्पादनांवर एचएसएन २००७ प्रमाणे १२ टक्के कर आकारणीमुळे उत्पादनाच्या किंमती वाढल्या. त्यामुळे बाजारपेठेत टिकून राहण्यास आणखी कठीण होऊन प्रक्रिया उद्योग अडचणीत आले आहेत, असे निवेदनात नमूद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com