दुष्काळात उभे राहण्याचा मंत्र मिळाला

अॅग्रोवनमधील यशकथामुळे बॅंकेने कर्ज मंजूर केले. कृषी प्रदर्शनामुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे. नवीन अवजारे, बियाण्याचे वाण, दुष्काळी परिस्थितीत पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान आदीची माहिती प्रदर्शनातून मिळाली. या माहितीचा निश्चित उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनामध्ये भेट देणे आवश्यक आहे. - शिवाजीराव सानप, शेवडी, ता. जिंतूर, परभणी
दुष्काळात उभे राहण्याचा मंत्र मिळाला
दुष्काळात उभे राहण्याचा मंत्र मिळाला

औरंगाबाद ः अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मराठवाडा, खानदेश, विदर्भातील बहुतांश भागातून शेतकऱ्यांनी हजेरी लावली. प्रामुख्याने महिलांचा सहभाग मोठा होता. ॲग्रोवन प्रदर्शन हे शेतीतील नव्या बदलांचा वारसा शेतकऱ्यांकडे पोचविण्याचे काम करत आहे. प्रदर्शनातून शेती करण्याची नवी उमेद मिळाली. दुष्काळातही हिमतीने उभे राहून शेती कशी करावी, याचा मंत्र प्रदर्शनातून मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. प्रतिक्रिया अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनामध्ये नवीन कृषी तंत्रज्ञान, बियाण्याच्या वाणाची तसेच पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान याबाबत माहिती सविस्तर माहिती मिळाली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळालेली माहिती उपयोगी ठरणार आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या सीताफळाची लागवड आमच्या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. अॅग्रोवनचे कृषी प्रदर्शन यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिशा देणारे ठरत आहे.

- भानुदास घुगे, अंबरवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी.

यंदाच्या दुष्काळी परिस्थिती पाण्याचा ठिबक संचाव्दारे काटेकोर वापर करून हळदीसोबत द्राक्ष लागवड केली आहे. अॅग्रोवनमधून तसेच कृषी प्रदर्शनातून कृषिपूरक उद्योग, नवीन कृषी अवजारे, तसेच तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. दुष्काळी परिस्थितीत शेती व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनास भेट देणे आवश्यक आहे. - मुंजाभाऊ सुरवसे, वरुड नृसिंह, ता. जिंतूर, जि. परभणी

औरंगाबाद येथे अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घघाटाची बातमी वाचल्यानंतर संपर्कातील शेतकऱ्यांना फोन करून प्रदर्शनास जाऊ म्हटले तर तीन शेतकरी लागलीच तयार झाले. यावर्षीच्या दुष्काळी स्थितीत पाण्याचा काटेकोर वापर करण्याबाबतची तसेच जमीन सुपिकता टिकवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्याची माहिती परिसंवादातून मिळाली. शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे हे प्रदर्शन आहे. - गजानन राठोड, कृषी सहायक, जिंतूर

माझ्याकडे ५० एकर शेती आहे. मी सध्या रासायनिक शेतीसोबत सेंद्रिय शेती करण्याकडे वळालो आहे. या ठिकाणी प्रदर्शनाला भेट दिली असता नवनवीन तंत्रज्ञान बघायला मिळाले. जनावरांसाठी पशुखाद्य असेल, ट्रॅक्टर, स्प्रेपंप व इतर बरीच शी दालने या ठिकाणी असून त्यामुळे ज्ञान मिळते. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे, असा माझा आग्रह आहे. - रामचंद्र पेरे गुरुजी, पाटोदा, ता. जि. औरंगाबाद

मी माझ्या पतीसोबत या ठिकाणी भेट द्यायला आले होते. आमच्याकडे शेती आहे. ही शेती करताना या प्रदर्शनातून आम्हाला प्रेरणा मिळेल. येथून घेतलेल्या माहितीचा फायदा नक्कीच होईल. काही तरी बदल करण्याचा आमचा प्रयत्न असेल. - यशोदाबाई कैलास पाडळे,  सिल्लोड, जि. औरंगाबाद

मी अॅग्रोवनचे कुठलेच प्रदर्शन चुकवित नाही. या दैनिकाने राज्यातील शेतकऱ्यांना नव्या दिशेने नेण्याचे सातत्याने काम केले आहे. औरंगाबादमधील हे प्रदर्शन अशाच नव्या माहितीचा खजिना असलेले आहे. मी ९ एकर शेती करतो. ही शेती करताना अॅग्रोवनमधील माहिताचा मोठा फायदा होत असतो. येथील प्रदर्शन पाहल्यानंतर मिळणारे ज्ञान बहुउपयोगी आहे. - भास्करराव जाधव, उमरद, जि. बुलडाणा

शेती, फळबाग संशोधनाविषयी प्रदर्शनात माहिती मिळाली. यासह औषध कोणती असावी, मल्चिंग पेपर या शेती उपयुक्त तंत्राची माहिती घेतली. ती या कृषी प्रदर्शनातून आम्हाला मिळाली. या मिळालेल्या माहितीचा आम्हाला नक्कीच लाभ होणार आहे. - नवनाथ धुपे, लाखेगाव, जि. औरंगाबाद

सकाळ ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनातून नवीन स्प्रे म्हणजे शेतीसाठी उपयुक्त असलेले पंप याची माहिती मिळाली. यासह अवजारे नवीन ट्रॅक्टर याची माहिती घेतली. शिवाय प्रदर्शनात प्रगतिशील शेतकऱ्यांच्या भेटी झाल्या व त्यातून त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले. - जितेंद्र पाबळे, पैठण, जि. औरंगाबाद

‘ॲग्रोवन’च्या अंकात एका आधुनिक फवारणी पंपाची माहिती आली होती. हेच पंप खरेदी करण्यासाठी मी उस्मानाबाद येथून या कृषी प्रदर्शनात आलो आहे. या प्रदर्शनात इतरही उपयुक्त माहिती मिळाली. ही माहिती आम्हाला आधुनिक शेती करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. - सुरेश पाटील, उस्मानाबाद

प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या बियाणे तसेच एक छोटीशी बाग याविषयी माहिती मिळाली. जनावरांसाठी असलेले खाद्य असून पाळीव प्राणी कुक्कुट पालन कसे करावे यासह अन्य माहिती मिळाली. - कौशल्या बाबासाहेब पांगिरे,  पांगीरेवाडी, ता. अंबड, जि. जालना

अॅग्रोवनचे प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी अतिशय मोलाचे आहे. येते आल्यानंतर शेतकऱ्यांना नवनविन ज्ञान, तंत्राचा खजिनाच सापडतो. मला ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनातील चर्चासत्रांमध्ये रस आहे. त्याकरिता मी मुक्काम करणार आहे. चर्चासत्रांच्या माध्यमातून प्रयोगशील शेतीची माहिती मिळण्यास मदत होते. सायकलचलित फवारणी पंप, डाळमिल, तसेच औजारांचे स्टॉल्स उपयुक्त आहेत. - रामराव नागनाथ तरकंटे,  मु. पो. वेळकुणी बुद्रुक, ता. बिलोली, जि. नांदेड शेती औजारांचे विविध स्टॉल्स मला आवडले. `अॅग्रोवन’चा मी वाचक असून, प्रत्येक उपक्रम चांगले असतात. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या स्थितीत आधुनिक शेती करू शकतो हे ‘अॅग्रोवन’ने ठसविण्यासाठी प्रदर्शनाचा राबविलेला यंदाचा उपक्रम मला आवडला. मी स्वतः दूधउत्पादक शेतकरी असून, मुरघास निर्मिती तंत्राचा स्टॉल मला विशेष आवडला. - नारायणराव घोडके, मु. पो. पाचोडे, ता. जि. औरंगाबाद

सेंद्रिय गूळ निर्मितीचा स्टॉल्स मला पसंत पडला. मी स्वतः दूध उत्पादक शेतकरी असून, दहा एकरवर ऊस पिकवतो. गूळनिर्मिती करण्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती मला प्रदर्शनातून मिळाली. अडीच एकर केळी बागेला सांभाळण्यासाठी तांत्रिक बाबी मला समजल्या. - विक्रम लाखे, मु. पो. एरंडगाव, जि. बीड

खरबूज, टरबूज बियाण्यांची माहिती मला ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनातून समजली. अवजारे, ठिबक, फलोत्पादन, डेअरी या विषयांची माहिती देणारे स्टॉल्स मला आवडले. - सुदाम गाडे पाटील,  मु. पो. तळवट बोरगाव, ता. गेवराई, जि. बीड

बॅंकेतील नोकरी करून गावाकडील २५ एकर शेती करत आहेत. त्यासाठी अॅग्रोवनची खूप मोठी मदत होत आहे. अॅग्रोवन कृषी प्रदर्शनातील मिनी ट्रॅक्टरसह अनेक शेती अवजारे शेतकऱ्यांच्या फायद्याची आहेत. स्वंयचलित स्वच्छतागृह, शेतीपूरक उद्योगांची माहिती मिळाली. कृषी ज्ञानाचा हा खजिना शेतकरी, शेतीसाठी निश्चितच उपयोगी ठरणार आहे. मराठवाड्यासारख्या सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अॅग्रोवनने या भागात नियमित कृषी प्रदर्शने भरविणे आवश्यक आहे. - प्रसाद वैद्य, पिंपळगाव गायके, ता. जिंतूर, जि. परभणी.

महिला शेतकऱ्यांना शेतीपूरक गृह उद्योग सुरू करण्यासाठी ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनातून प्रेरणा मिळणार आहे. पिठाची गिरणी, तेल घाणी या बाबत तसेच फळप्रक्रिया उद्योगाची माहिती विविध दालनांवरून मिळाली. ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अॅग्रोवनमधील महिला यशकथा प्रेरणादायी ठरत आहेत. - शैलजा काळे , डिग्रज, जि. यवतमाळ.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com