agriculture news in marathi, Getting water from Karnataka is difficult | Agrowon

जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

सांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला पाणी मिळू नये, यासाठी कर्नाटकातील लोकप्रतिनिधी, जनतेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. परिणामी महाराष्ट्र आणि कर्नाटक पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. 

सांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला पाणी मिळू नये, यासाठी कर्नाटकातील लोकप्रतिनिधी, जनतेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे जत तालुक्यातील ४२ गावांना पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. परिणामी महाराष्ट्र आणि कर्नाटक पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. 

जतच्या ४२ गावाचे क्षेत्र ७३ हजार ०१४ हेक्‍टर आहे. हिरेपसलडगी योजनेतून जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांना पाणी देणे शक्‍य असल्याची चर्चा आहे. २०१३ मध्ये या ४२ गावांना तांत्रिकदृष्ट्या पाणी कसे देता येईल, याचा अहवाल तयार केला. तो शासनाकडे दिला. दरम्यान, कर्नाटकातील तुबची-बबलेश्‍वर योजनेतून या गावांना पाणी देणे शक्‍य होईल, असा अहवाल पाटबंधारे विभागाने तयार केला. त्यानुसार या योजनेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १० कोटी रुपये मंजूर केले. परंतु त्यानंतर ही योजना पूर्ण करण्यासाठी दोन्ही राज्यांतील सरकारने पुढाकार घेतला नाही. 

गेल्या वर्षी सांगली येथील पाटबंधारे विभागात कर्नाटक आणि राज्यातील पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. लवकरच पाणी देण्याचा निर्णय त्यात झाला. परंतु गेल्या सहा महिन्यांपूर्वी पुन्हा या योजनेतून जतला पाणी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तुबची-बबलेश्वर योजना सुरू करून पाणी दिले. ही केवळच चाचणी होती. 

जत तालुक्‍यातील पूर्व भागाला पाणी देण्यासाठी सरकारच्या कोणत्याही हालचाली नसल्याचे चित्र आहे. जत तालुक्‍याच्या पूर्व भागातील ४२ गावांचे अंदाजे क्षेत्र ७३ हजार १४ हेक्‍टर आहे. ही योजना सुरू झाल्यास सुमारे ३५ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येण्याची शक्‍यता आहे. दोन्ही सरकारांनी ही योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.  

या योजनेतून ३२ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल. सुमारे ३९ किलोमीटर अंतरापर्यंत मुख्य वाहिनी आहे. होनवाड, तळसंग, बिजरगी, तिकोटा, कोट्टलगी, कनमडी असे एकूण सहा शाखा कालवे आहेत. त्यांच्याद्वारे नैसर्गिक उताराने पाणी दिले जाईल. 
अलमट्टी धरणातून जतच्या ४२ गावांना पाणी द्या, असा प्रस्ताव राज्य शासनाने कर्नाटक सरकारकडे ठेवला. पण तो कर्नाटक सरकारने फेटाळला आहे. 

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...