गेवराईत शंभर आंदोलकांवर गुन्हे; वडवणीत मोर्चा

गेवराईत शंभर आंदोलकांवर गुन्हे; वडवणीत मोर्चा
गेवराईत शंभर आंदोलकांवर गुन्हे; वडवणीत मोर्चा

बीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत शासनाची मेगा भरती थांबवावी, या मागणीसाठी जिल्ह्यात नऊ दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. बुधवारी (ता. २५) गेवराईतील आंदोलनप्रकरणी शंभर आंदोलकांवर गुन्हे नोंद करण्यात आले असून, गुरुवारी (ता. २६) वडवणीत मोर्चा निघाला. जिल्ह्यात दोन ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. माजलगाव पंचायत समितीच्या उपसभापतींनी राजीनामा दिला आहे.

बुधवार (ता. १८)पासून परळीत सुरू झालेले ठिय्या आंदोलन गुरुवारी (ता. २६) नवव्या दिवशीही सुरूच होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. दरम्यान, बुधवारी गेवराईत अर्धनग्न आंदोलन करून आमदारांच्या घराकडे मोर्चा वळविला. आमदार लक्ष्मण पवार यांच्यासोबत बाचाबाचीनंतर पोलिस व मोर्चेकरी अामनेसामने अाले होते. या वेळी आंदोलकांनीही दगडफेक केली. याच दिवशी गेवराई व परिसरात नऊ बसची तोडफोड झाली.

या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात १०० आंदोलकांविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यातील ११ आंदोलकांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी वडवणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीला समर्थन आणि आंदोलन चिघळले असतानाही शासनाचे होत असलेले दुर्लक्ष याच्या निषेधार्थ माजलगाव पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती सुशील सोळंके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com