ghate ali on  green gram in Akola district
ghate ali on green gram in Akola district

अकोला जिल्ह्यात हरभऱ्यावर वाढला घाटे अळीचा प्रादुर्भाव

अकोला : रब्बीत लागवड झालेल्या हरभरा पिकावर अनेक ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. यामुळे ठिकठिकाणी सलग फवारणीची कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.  

यंदाचा खरीप चांगला न राहिल्याने शेतकऱ्यांची मदार रब्बीवर टिकून आहे. रब्बीत या भागात हरभऱ्याचे क्षेत्र तिन्ही जिल्हे मिळून दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रापर्यंत पोचले आहे. हरभऱ्याची लागवड टप्प्याटप्प्याने झाली आहे. सुरुवातीला लागवड केलेले पीक परिपक्व झाले. तर, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लागवड झालेल्या पिकांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

या वर्षात बदललेल्या वातावरणाचा सातत्याने शेतकऱ्यांना फटका बसला. आता रब्बीतही अशीच परिस्थिती तयार होत आहे. आठवडाभर थंडीचा जोर राहतो. तर, नंतर ढगाळ वातावरण बनल्याने पुन्हा थंडी कमी होते. हरभरा पिकावर ढगाळ वातावरणाचा परिणाम पडला आहे. हरभऱ्याचे पीक हिरवे व फुलोरावस्थेत असताना अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. 

ढगाळ वातावरणाचा जोर 

मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण व नंतर थंडीचा जोर वाढला. हवामान खात्याने विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. प्रामुख्याने हरभऱ्यावरील घाटेअळीने शेतकऱ्यांना चिंतातुर बनविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com