Agriculture news in marathi Ghateali on gram crop in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यामध्ये हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जानेवारी 2020

नगर : जिल्ह्यामध्ये यंदा सातत्याने बदलत्या हवामानाचा रब्बीतील हरभरा पिकावर परिणाम होताना दिसत आहे. सकाळी पडणारे धुके, ढगाळ हवामानामुळे कर्जत, पारनेर भागात हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये रब्बीत हरभऱ्याचे १ लाख १८ हजार १०३ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा मात्र, साठ टक्के क्षेत्रावरच म्हणजे ७० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यंदा, पावसाळ्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची आशा होती. मात्र, फारसे क्षेत्र वाढले नाही.

सध्या हरभऱ्याला घाटे लागलेले आहेत. मात्र, गेल्या महिनाभरापासून सातत्याने हवामान बदलत आहे. सकाळी धुके, ढगाळ हवामान निर्माण होत असल्याने हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पारनेर, शेवगाव, नगर, कर्जत, जामखेड भागात हरभऱ्याचे चांगले उत्पादन घेतले जाते. उत्पादनात घट होण्याची भीती आहे, असे राजेंद्र गलांडे या शेतकऱ्यांनी सांगितले. 

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे

हरभऱ्याचे पीक अडचणीत असल्याने व उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात असताना घाटेअळीचा प्रादुर्भाव कसा रोखायचा? याबाबत कृषी विभागाकडूनही मार्गदर्शन मिळत नाही. कृषी विभागाने तातडीने घाटेअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ३६६ मंडळांत पूर्व मोसमी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील...
सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात रविवारी पूर्वमोसमी पावसाने...
‘पंदेकृवि’तर्फे उद्या खरीपपूर्व कृषी...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
नगरमधील दहा तालुक्यांत जोरदार पाऊसनगर ः नगर जिल्ह्यात रविवारी (ता. ३१) दहा...
मराठवाड्यात बियाणे, खते खरेदीस वेग औरंगाबाद : मराठवाड्यातील सोयगाव, देगलूर, बिलोली,...
नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात...नाशिक : जिल्ह्याच्या पूर्व भागात नांदगाव...
नाफेड केंद्रावर तूर विकण्याचा...अमरावती ः शेतकऱ्याच्या नावावर नोंदणी करुन हमीभाव...
हमीभावाने तूर-हरभरा खरेदीस मुदतवाढअमरावती ः लॉकडाउनमुळे हमीभावाने तूर व हरभरा...
सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरीसिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पावसाने...
कोल्हापुरातील बहुतांश तालुक्यांना...कोल्हापूर : मॉन्सूनपूर्व पावसाने रविवारी (ता. ३१...
सोलापुरातील चार मध्यम प्रकल्पांमध्ये...सोलापूर ः लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे असलेल्या...
टेंभू योजनेतून आटपाडी तालुक्यातील पंधरा...आटपाडी, जि. सांगली ः टेंभू योजनेच्या पाण्यातून...
नाशिकमध्ये लसणाची आवक कमी, ८५०० रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगलीत हळदीच्या आवकेत ७ हजार ५५०...सांगली : येथील बाजार समितीच्या आवारात हळदीची...
सोलापुरात खरेदी केंद्रांवर मक्याची...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीने...
कोपरगाव तालुक्यात गिन्नी गवतावर...नगरः नगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वडगाव...
नगर तालुक्यातील १०५ गावांत दरवर्षी आठ...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अचानक...
कांदा दरवाढीसाठी शेतकरी लिहिताहेत...नाशिक : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा कांदा थेट २०...
‘कुकडी’च्या आवर्तनाबाबत आमदारांनी... नगर : कर्जत-जामखेडला ‘कुकडी’चे उन्हाळी...
राज्यात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस : डॉ....पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (मॉन्सून...