यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या घटमांडणीचे भाकित

यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या घटमांडणीचे भाकित
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या घटमांडणीचे भाकित

भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस समाधानकारक राहील. देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असून दुष्काळी परिस्थिती फारशी उदभवणार नाही, असे भाकित भेंडवळच्या घटमांडणीने दिले.  शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधणारी बहूचर्चित भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी (ता.18) सायंकाळी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सुर्याेदयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांनी भाकित व्यक्त केले. 

साडेतीनशे वर्षांपुर्वी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळमधील वाघ वंशाजाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी भेंडवळ घटमांडणीची सुरूवात केली. हवामान, पीक पाण्यासह इतर भाकिताची ही परंपरा या वाघ कुटुंबियाने आजही जपली आहे. विधिवत पूजन करून ही घटमांडणी केली जाते. 

अक्षयतृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत गावाशेजारील शेतात घटमांडणी केली होती. गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करण्यात आला. यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक म्हणून चार मातीची ढेकळे व त्यावर घागर ठेवण्यात आली.  या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, कुरडई, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतिकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली होती. घटात अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपाशी, मटकी, मुंग, उडीद, करडी, तांदुळ, जवस, तीळ, मसुर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करण्यात आली होती.  धान्य आणि खाद्य पदार्थांची पाहणी करून भाकित व्यक्त करण्यात आले. येत्या हंगामात खरीपातील ज्वारी, मूग, बाजरी, जवस ही पिके व्यवस्थित येतील असे सांगण्यात आले. तर कपाशी, तूर, उडीद, तीळ, भादली, लाख, वाटाणा, ही पिके कमी अधिक प्रमाणात येतील. रब्बीत गहू, हरभरा ही पिकेही सामान्य सांगण्यात आली. पावसाचा अंदाज देताना जूनमध्ये पाऊस सुरु होणार असला तरी पेरण्या जुलैत होतील. जूनपेक्षा जुलैमध्ये अधिक पाऊस पडेल. त्यानंतर आॅगस्टमध्ये अधिक पाऊस पडणार आहे. सप्टेंबरमध्ये साधारण पाऊस असेल. शिवाय लहरी स्वरुपातील पाऊस होईल.  चार महिन्यांच्या काळात साधारण स्वरुपातील पाऊस होईल.  देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान कायम राहणार असला तरी त्याला चिंता असेल. आर्थिक स्थिती मजबूर राहील. यंदा मोठी नैसर्गिक आपत्ती नसेल. देशाचे शत्रू त्रास देतील, परंतु संरक्षण मजबूत असल्याने कुठलाही धोका होणार नाही. शेतमालाच्या भावात तेजीमंदीचा अंदाजही मांडण्यात आला. या घटमांडणीचे भाकित एेकण्यासाठी हजारो शेतकरी पहाटेपासून उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com