नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
ताज्या घडामोडी
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडा
नगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून दक्षिणेतील पूर्व भागात असलेल्या घाटशीळ पारगाव प्रकल्पात पाणी आलेच नाही. पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे सीना प्रकल्पात काही प्रामाणात पाणी साठले असून खैरी प्रकल्पातही अल्प पाणीसाठा आहेत. पाथर्डी तालुक्यात जोराचा पाऊस नसल्याचा हा परिणाम आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत अकरा तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून अन्य तालुक्यांतही सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस असून पाणीसाठाही जास्त असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा अकोले तालुक्यात दीड पट तर अन्य आठ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जवळपास दहा तालुक्यांत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस झाला आहे. अकोल्यातील पावसामुळे उत्तर भागातील निळवंडे, भंडारदरा, आढळा, मुळा ही धरणे दोन महिन्यांपूर्वीच भरली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाणीसाठा झाल्याचे प्रशासन सांगत असले तरी मात्र दक्षिणेत असलेल्या पाथर्डी, कर्जत तालुक्यातील बहुतांश धरणे अजून रिकामी आहेत. बीड-नगरच्या सीमेवर असलेल्या घाटशीळ पारगाव धरणात थेंबभरही पाणी आलेले नाही. या भागात अन्य कोणत्याही जलस्रोत नसल्याने घाटशीळ पारगाव वरच अनेक गावे अवलंबून आहेत.
गेल्यावर्षीही हे धरण कोरडेच होते. खैरी धरणात अवघा दोन टक्के पाणीसाठा झाला आहे. सीना धरण आतापर्यंत कोरडेच होते. मात्र, मध्यंतरी भोसे खिंडीतून पाणी आणण्यात आले. शिवाय नगर भागात पंधरा दिवसांत झालेल्या पावसामुळे सीना धरणात पाणीसाठा झाला असला तरी धरण यंदाही भरले नाही. पारनेरमधील मांडओहळ धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला असला तरी यंदाही पूर्ण क्षमतेने अद्यापर्यत तरी भरू शकेल नाही. ज्या भागात सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो त्याच भागातील धरणात यंदही पुरेसा पाणीसाठा झाला नसल्याचे दिसत आहे.
तालुकानिहाय पाऊस, कंसात गतवर्षीचा पाऊस (टक्के) ः अकोले ः २६६ (१२०.१४), संगमनेर ः १४८.१० (९९.३८), कोपरगाव ः १२६.०८ (७४.५१), श्रीरामपूर ः १४३.०१ (९५.९८), राहुरी ः ९८.३५ (५६.७०), नेवासा ः १२९.१२ (५२.५१), राहाता ः १०९.२७ (६७.७०), नगर ः १११.०१ (५०.७३), शेवगाव ः ९६.०९ (७४.७८), पाथर्डी ः ९२.९६ (५६.८३), पारनेर ः ११४.३७ (६६.२६), कर्जत ः ८०.१० (४५.८४), श्रीगोंदा ः १०२.९९ ( ५३.२८), जामखेड ः ८२.०३ (६५.०२).
धरणातील पाणीसाठा, कंसात गतवर्षीचा पाणीसाठा (टक्के)
भंडारदरा | १०० (९४.११) |
निळवंडे | ९८.४३ (८५.४४) |
मुळा | ९९.९० (७२.५८) |
मांडओहळ | ६३.६८ (११.०८) |
घाटशीळ | ० (०) |
खैरी | २,०७ (१२.०८) |
सीना | ४१.२७ (२४.७०) |
आढळा | १०० (५५.०९) |
- 1 of 1027
- ››