राज्यात घेवडा ८०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

Ghevda 800 to 3500 rupees per quintal In the state
Ghevda 800 to 3500 rupees per quintal In the state

पुण्यात दहा किलोस २०० ते ३०० रुपये

पुणे: गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) घेवड्याची सुमारे ८ टेम्पो आवक झाली. या वेळी त्यास दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर मिळाला. मात्र, हाच दर गेल्या चार दिवसांमध्ये ४०० रुपयांपर्यंत राहिला. घेवड्याची आवक ही प्रामुख्याने पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर आदी भागांसह कर्नाटक राज्यांतून होत असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.  ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

परभणीत घेवडा १२०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

परभणी  येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १९) घेवड्याची (वाल) २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून तसेच जिल्ह्यातील दैठणा, रायपूर, कोक आदी गावातून घेवड्याची आवक होत आहे. गेल्या महिन्याभरातील प्रत्येक गुरुवारी घेवड्याची ७ ते २५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला १२०० ते ३००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १९) त्याची २५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये राहिले. किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू आहे, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

साताऱ्यात २००० ते २५०० रुपये

सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी वॉल घेवड्याची सहा क्विंटल आवक झाली. त्यास क्विंटलला २००० ते २५०० असा दर मिळाला.

काळा घेवड्याची आठ क्विंटल आवक होऊन क्विंटलला ३००० ते ३५०० असा दर मिळाला आहे. वॅाल घेवड्याचे दर स्थिर असून काळा घेवड्याच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

कोरेगाव, सातारा, खटाव आदी तालुक्यांतून वॅाल व काळा घेवड्याची आवक होत आहे. गतसप्ताहातील गुरुवारी (ता. १२) वॅाल घेवड्याची १२ क्विंटल आवक झाली. त्या वेळी क्विंटलला २००० ते २२०० असा दर मिळाला. तर, काळ्या घेवड्याची चार क्विंटल आवक होऊन क्विंटलला ४००० ते ४५०० असा दर मिळाला. वॉल घेवड्याची ३५  ते ४०, तर काळ्या घेवड्याची ५० ते ६० रुपयांनी किरकोळ विक्री केली जात आहे.

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये

नाशिक  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १८) घेवड्याची ५१६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रूपये राहिले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. १७) घेवड्याची आवक ६२२ क्विंटल झाली. त्याला २००० ते ३५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होता. सोमवारी (ता. १६) आवक ७२० क्विंटल झाली. त्या वेळी १८६० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २४०० रुपये मिळाला. रविवारी (ता. १५) घेवड्याची आवक ५१९ क्विंटल झाली. तेव्हा १८०० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २४६० मिळाला.

शनिवारी (ता. १४) आवक ७२५ क्विंटल झाली. त्या वेळी घेवड्याला १५०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रुपये होते. शुक्रवारी (ता. १३) घेवड्याची आवक ७१० क्विंटल झाली. त्या वेळी २४०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होते. गुरुवारी (ता. १२) आवक ४३५ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होते.

मागील आठवड्यापासून बाजार समितीत घेवड्याची आवक सर्वसाधारण होती. गेल्या दोन दिवसांत आवक कमी झाली असून त्यानुसार दर सर्वसाधारण आहेत. बाजारात होत असलेल्या आवकेच्या कमी जास्त प्रमाणामुळे घेवड्याच्या बाजारभावतही चढ-उतार दिसून आला.

सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये दर

सांगली येथील शिवाजी मंडईत घेवड्याची आवक कमी अधिक होत आहे. गुरुवारी (ता.१९) ३० पोत्यांची (एक पोते ३५ किलो) आवक झाली होती. त्यास प्रति दहा किलोस दर २५० ते ३०० असा दर मिळाला.

मंडईत सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यासह कर्नाटक सीमेवरील अथणी, मंगसुळे या भागातून घेवड्याची आवक होते. बुधवारी (ता. १८) घेवड्याची २५ पोत्यांची आवक झाली होती. त्यास प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. १७) घेवड्याची ३५ पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २३० ते २८० रुपये असा दर होता.

सोमवारी (ता. १६) घेवड्यांची ३० पोत्यांची आवक झाली. त्यावेळी प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. पुढील सप्ताहात घेवड्याची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

औरंगाबादमध्ये ८०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी (ता.१९) घेवड्याची (वालशेंग) १० क्‍विंटल आवक झाली. त्यांना ८०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १० डिसेंबरला ५ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ११ डिसेंबरला ४ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी घेवड्याचे दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२ डिसेंबरला ५ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी घेवड्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

१४ डिसेंबर रोजी ६ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १६ डिसेंबर रोजी ६ क्‍विंटल आवक झाली. दर ८०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल मिळाला. १७ डिसेंबर रोजी घेवड्याची आवक ७ क्‍विंटल तर, दर १३०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १८ डिसेंबर रोजी ४ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

नगरमध्ये एक हजार ते तीन हजार रुपये

 नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.१९) घेवड्यास प्रती क्विंटल १००० ते ३००० व सरासरी दोन हजार रुपयाचा दर मिळाला. घेवड्याच्या आवकेत सतत चढउतार होत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात आवक कमी आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत नगरसह शेजारच्या जिल्ह्यातून आवक होत आहे. १२ डिसेंबर रोजी ९ क्विटंलची आवक होऊन १००० ते २५०० व १७५० रुपयाचा सरासरी दर मिळाला. ३ डिसेंबर रोजी २६ क्विटंलची आवक होऊन १५०० ते २००० व सरासरी १६५० रुपयाचा दर मिळाला.

२९ नोव्हेंबर रोजी २७ क्विटंलची आवक होऊन १५०० ते २५०० व सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला. अलिकडच्या काळात भाजीपाल्याची लागवड वाढली असल्याने पुढच्या आठवड्यात आवकेत वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.  ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा

अकोल्यात ९०० ते १५०० रुपये

अकोला येथील बाजारात सध्या घेवड़याची आवक अत्यल्प असल्याचे सूत्रानी सांगितले. गुरुवारी (ता.१९) आवक झालेल्या घेवड्याला ९०० ते १५०० पर्यंत दर मिळाला. येथील बाजारात मागील काही दिवसांत आवक कमी झाली आहे. गुरुवारी ५ क्विंटल पेक्षा कमी होती.

किरकोळ विक्री ४० रुपये दराने ग्राहकाना बाजारात केली जात होती. येथील बाजारात स्थानिकसह मध्य प्रदेश, खांदेशमधून आवक होत असते. या भागात अति पावसामुळे लागवड उशिरा झाली. शिवाय वातावरण ठीक नसल्याचा फ़टका याही पिकाला बसला.  अद्याप बाजारात आवक वाढलेली नाही. पुढील १५ ते २० दिवसात आवकेत सुधारणा होईल, असेही सूत्राचे म्हणणे होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com