Agriculture news in marathi Ghewada in the State 500 to 3500 rupees per quintal | Agrowon

राज्‍यात घेवडा ५०० ते ३५०० रूपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 मार्च 2020

परभणीत ५०० ते १००० रुपये दर

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१२) घेवड्याची (वाल) २० क्विंटल आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० ते कमाल १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

‘‘सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील परभणी तालुक्यातील गावांतून घेवड्याची आवक होत आहे. गेल्या आठवड्यापासून ही आवक वाढली आहे. गेल्या महिन्याभरातील प्रत्येक गुरुवारी घेवड्याची ६ ते २० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला किमान ५०० ते कमाल १५०० रुपये दर मिळाले.

परभणीत ५०० ते १००० रुपये दर

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१२) घेवड्याची (वाल) २० क्विंटल आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० ते कमाल १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

‘‘सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील परभणी तालुक्यातील गावांतून घेवड्याची आवक होत आहे. गेल्या आठवड्यापासून ही आवक वाढली आहे. गेल्या महिन्याभरातील प्रत्येक गुरुवारी घेवड्याची ६ ते २० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटलला किमान ५०० ते कमाल १५०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.१२) घेवड्याची २० क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये होते. तर, किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरू होती,’’ असे व्यापारी प्रकाश बोराडे 
यांनी सांगितले.

मार्केटमधील आवक दर (क्विंटल-रुपये)

तारीख आवक किमान कमाल
१३ फेब्रुवारी १२००  १५००
२० फेब्रुवारी १००० १५००
२७ फेब्रुवारी १० ८००  १२००
५ मार्च १२  ६०० १२००
१२ मार्च २० ५०० १०००

अकोल्यात १८०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल

अकोला : येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. १२) घेवड्याची नाममात्र आवक झाली. गेल्या काही दिवसांत घेवडा किमान १८०० ते कमाल ३००० रुपये दरम्यान प्रतिक्विंटल दराने विक्री होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी 
सांगितले.

या भागात घेवड्याची पाहिजे तितकी लागवड केली जात नाही. इतर जिल्ह्यांतून आवक होत असते. सध्या एक क्विंटलच्या आतच आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी घेवडा १८०० ते ३००० दरम्यान विक्री झाला. 

आवक कमी असून मागणीसुद्धा तितकी नाही. परिणामी, या भागात घेवड्याची लागवडही नाममात्र केली जाते. यंदा बाजारात घेवड्याला अनेक दिवसांपासून उपरोक्त दर मिळत असल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोल्हापुरात ३०० ते ३५० रुपये दहा किलो

कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये घेवड्याची दररोज ४० ते ५० पाट्या आवक होत आहे. घेवड्यास दहा किलोस किमान ३०० ते कमाल ३५० रुपये इतका दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून घेवड्याचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

येथील बाजार समितीत घेवड्याची आवक स्थानिक गावाबरोबरच बेळगाव भागातून होते. सध्या घेवड्यास माफक मागणी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

नगरमध्ये ५०० ते १६०० रुपये दर

नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१२) घेवड्याची पाच क्विंटलची आवक झाली. त्यास किमान ५०० ते कमाल १६०० व सरासरी १०५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नगर बाजार समितीमध्ये गेल्या महिनाभराच्या तुलनेत घेवड्याच्या आवक दरात चढउतार होत आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर दिवसाला सरासरी पाच ते ३० क्‍विंटलपर्यंत घेवड्याची आवक होत असते. ६ मार्च रोजी १८ क्विंटल आवक होऊन ५०० ते बाराशे रुपये व सरासरी साडेआठशे रुपये दर मिळाला. तर दोन मार्च रोजी १३ क्विंटल आवक होऊन ५०० ते १२००, तर सरासरी साडेआठशे रुपयांचा दर मिळाला. 

२४ मार्च रोजी घेवड्याची तीन क्विंटल आवक होऊन किमान १००० ते कमाल २००० रुपये व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. १८ फेब्रुवारी रोजी २२ क्‍विंटल आवक होऊन ८०० ते १२०० व सरासरी एक हजार रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले. गेल्या महिनाभराचा विचार करता घेवड्याच्या आवकेत आणि दरात सातत्याने चढउतार होत आहे.

जळगावात १५०० ते २५०० रुपये दर

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १२) घेवड्याची तीन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २५०० रुपये असा मिळाला. आवक नाशिक, पुणे आदी भागातून होत आहे. दर स्थिर असून, महिनाभरात किमान दर १५०० रुपयांखाली गेलेले नाहीत, अशी माहिती मिळाली.

नाशिकमध्ये १०५० ते २००० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.११) घेवड्याची आवक ४१० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान १०५० ते कमाल २००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मागील आठवड्यापासून बाजार समितीत घेवड्याची आवक कमी जास्त होत आहे. गेल्या तीन दिवसांत आवक कमी झाली. दरही कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी (ता.१०) घेवड्याची आवक ४०३ क्विंटल झाली. त्यास किमान १५०० ते कमाल २५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये होता.

सोमवारी (ता.९) घेवड्याची आवक ३३१ क्विंटल झाली. त्यास १५०० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० होता. रविवारी (ता.८) घेवड्याची आवक ४३८ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १०५० होता. शनिवारी (ता.७) घेवड्याची आवक ६०८ क्विंटल झाली. त्या वेळी ६०० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये होता. शुक्रवारी (ता.६) आवक ६३० क्विंटल झाली. त्या वेळी १२०० ते २७०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रुपये होता. गुरुवारी (ता.५) घेवड्याची आवक ५९२ क्विंटल झाली. त्यास किमान १००० ते कमाल २३०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १८०० रुपये राहिला.

औरंगाबादमध्ये घेवडा ७०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१२) घेवड्याची (वालशेंग) आवक ४ क्‍विंटल झाली. या घेवड्याला किमान ७०० ते कमाल ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये २९ फेब्रुवारीला ८ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी घेवड्याला किमान ६०० ते कमाल ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ मार्चला ४ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याचा दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५ मार्चला ५ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याचा दर ७०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 

घेवड्याची ७ मार्चला ८ क्‍विंटल आवक झाली. त्या वेळी घेवड्याला किमान ६०० ते कमाल ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ मार्चला घेवड्याची आवक ५ क्‍विंटल, तर दर ५०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११ मार्चला ७ क्‍विंटल आवक झालेल्या घेवड्याला (वालशेंग) ३०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

साताऱ्यात घेवड्यास प्रतिक्विंटल १००० ते १५०० रूपयांचा दर

सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी (ता.१२) काळा घेवड्याची नऊ क्विंटल आवक झाली. त्यास प्रति क्विंटलला किमान १५०० ते कमाल २००० रूपये दर मिळाला. तर, वॅाल घेवड्याची सहा क्विंटल आवक झाली. त्यास क्विंटलला किमान १००० ते कमाल १५०० रूपयांचा दर मिळाला. काळा व वॅाल घेवड्याची दर मागील तीन सप्ताहापासून स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या 
सूत्रांनी दिली. 

कोरेगाव, खटाव, सातारा या तालुक्यात घेवड्याची आवक होत आहे. गुरूवारी (ता. ५) काळा घेवड्यास क्विंटलला १५०० ते २०००, तर वॅाल घेवड्यास क्विंटलला ८०० ते १००० असा दर मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यातही घेवड्यांना या दरम्यानच दर मिळाला आहे. काळा घेवड्याची ३० ते ४० रुपये, तर वॅाल घेवड्याची ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे, अशी माहिती सूंत्रांनी दिली.

ताज्या बाजार भावासाठी क्लिक करा


इतर बाजारभाव बातम्या
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये लसूण ३६०० ते ५२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...