नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर टिकून

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येवालपापडी-घेवड्याची आवक ६१५३ क्विंटल झाली. सध्या आवकेत वाढ झाली आहे. तुलनेत दरही टिकून असल्याचेदिसून आले.
Ghewadya in Nashik Increase in income; Rate survival
Ghewadya in Nashik Increase in income; Rate survival

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  वालपापडी-घेवड्याची आवक ६१५३ क्विंटल झाली. सध्या आवकेत वाढ झाली आहे. तुलनेत दरही टिकून असल्याचे  दिसून आले. वालपापडीला प्रतिक्विंटल ५००० ते ६००० असा, तर सरासरी दर ५५०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ३००० ते ४०००, तर सरासरी दर ३५०० रुपये राहिला. 

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक १११९१ क्विंटल झाली. मागणी कायम असून आवकेसह बाजारभाव सर्वसाधारण आहेत. त्यास कांद्याला प्रतिक्विंटल १००० ते ३४००, तर सरासरी दर २२२० रुपये राहिला. बटाट्याची आवक ६१५२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १४००, तर सरासरी दर ९०० रुपये राहिला. लसणाची आवक १७६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ९५००, तर सरासरी दर ६७०० रुपये राहिला. आल्याची आवक ३५१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ५०००, तर सरासरी दर ४५०० रुपये राहिला.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक सर्वसाधारण असल्याने दरात तेजी कायम आहे. हिरव्या मिरचीची आवक ३२४  क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ४०००, तर सरासरी दर ३५०० रुपये राहिला. वाटाण्याची आवक  ११७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १३००० ते १६००० तर सरासरी दर १४५०० रुपये राहिला. गाजराची आवक २३५३  क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ३८०० तर सरासरी दर ३४०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते १२००, तर सरासरी ७००, वांगी ६०० ते ९०० तर सरासरी ७५० व फ्लॉवर १५० ते ४१० सरासरी २६० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला ५० ते १४०, तर सरासरी१०० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ३०० ते ७५०, तर सरासरी दर ५०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २०० ते ४५०, तर सरासरी ३५०, कारले १५० ते २५०, तर सरासरी २००, गिलके ३०० ते ४५०, तर सरासरी ३०० व दोडका २५० ते ४५०, तर सरासरी दर ३०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात  डाळिंबाची आवक ७३४ क्विंटल झाली. मृदुला वाणास ३०० ते ७५००, तर सरासरी ५००० रुपये दर मिळाला. तर आरक्ता वाणास ४०० ते ११०००, तर सरासरी ८५०० रुपये दर मिळाला. केळीची आवक ८६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते १५००, तर सरासरी दर १२०० रुपये मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com