नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात सुधारणा

नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात वालपापडी-घेवड्याची आवक ११२३ क्विंटल झाली. सध्या आवकेत वाढ होण्यासह दरही टिकून असल्याचेदिसून आले.
Ghewda arrives Decreased in Nashik; Rate improvement
Ghewda arrives Decreased in Nashik; Rate improvement

नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात वालपापडी-घेवड्याची आवक ११२३ क्विंटल झाली. सध्या आवकेत वाढ होण्यासह दरही टिकून असल्याचे दिसून आले. वालपापडीला प्रतिक्विंटल ३५०० ते ७५०० तर सरासरी दर ६००० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ३००० ते ६५००, तर सरासरी दर ५००० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ९६७५ क्विंटल झाली. मागणी कायम असून आवकेसह बाजारभाव सर्वसाधारण आहेत. त्यास कांद्याला प्रतिक्विंटल ११००ते २३००, तर सरासरी दर १७५० रुपये राहिला. बटाट्याची आवक ३८२८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते १३००, तर सरासरी दर ८५० रुपये राहिला. लसणाची आवक ५१४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६००० ते ११८००, तर सरासरी दर ८५०० रुपये राहिला. आल्याची आवक ४८५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ११०० ते २२००, तर सरासरी दर १७०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १२५ ते २५०, तर सरासरी १७५, वांगी ३०० ते ६००, तर सरासरी ४५० व फ्लॉवर ५० ते १३५ सरासरी ९० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला १२५ ते २५० तर सरासरी१७० रुपये दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १२५ ते २५० तर सरासरी दर १७५ रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा १०० ते २५० तर सरासरी १५०, कारले ४०० ते ५००, तर सरासरी ४५०, गिलके ३०० ते ५००, तर सरासरी ४५० व दोडक्याला ५०० ते १०००, तर सरासरी दर ७५० रुपये प्रति १२ किलोस मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबांची आवक २३३३ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४००० ते १०००० तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाला. केळीची आवक १०९० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १२५०, तर सरासरी दर १००० रुपये मिळाला. आंब्यांची आवक २९८२ क्विंटल झाली. केशर वाणास ५००० ते ८०००, तर सरासरी ६००० रुपये दर मिळाला.

लालबागला २००० ते ४०००, तर सरासरी ३००० रुपये दर मिळाला.  बदामला २००० ते ४०००, तर सरासरी ३५०० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com