Agriculture news in marathi Ghewda in the Nagar, improvement in eggplant prices | Agrowon

नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात घेवडा, वांग्यांच्या दरात चांगली सुधारणा झाली.

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात घेवडा, वांग्यांच्या दरात चांगली सुधारणा झाली. बटाट्यांची दर दिवसाला तीनशे ते चारशे क्विंटल आवक होत आहे. भुसारच्या आवकेत मात्र अजूनही फारसा फरक पडला नाही. फळांची आवकही जेमतेम आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याची दर दिवसाला पंधरा ते वीस क्विंटलची आवक होत आहे. प्रती क्विंटलला तीन हजार ते पाच हजार रुपयांचा, तर वांग्यांची दर दिवसाला  पस्तीस ते चाळीस क्विंटल आवक, तर दर दोन हजार ते चार हजारांच मिळत आहे.

शेवग्याची आठ ते पंधरा क्विंटलची आवक आहे. चार हजार ते पाच हजार रुपयाचा दर मिळत आहे. टोमॅटोची ३५ ते ४० क्विटंल आवक होत आहे. पाचशे ते दिड हजार रुपये, फ्लॉवरची ४५ ते ५५ क्विंटलची आवक होत  आहे. दर दिड हजार ते आडीच हजार, काकडीची २५ ते ३० क्विंटलची आवक होत आहे. तर, दर पाचशे ते एक हजार, गवारीची चौदा ते वीस क्विंटलची आवक, तर दर चार हजार ते पाच हजार रुपयांचा मिळत आहे. 

दोडक्याची दर दिवसाला वीस ते पंचवीस क्विंटल आवक झाली. दर दोन हजार ते चार हजार, तर कारल्याची २४ ते ३० क्विंटलची आवक, दर दिड हजार ते आडीच हजार रूपये मिळाला. भेंडीची दर दिवसाला वीस ते पंचवीस क्विटंलची आवक होऊन एक हजार ते दोन हजार, वालाची दहा ते पंधरा क्विंटल आवक होऊन दर दोन हजार ते तीन हजार, बटाट्याची तीनशे ते चारशे क्विंटलची आवक, तर दर दोन हजार ते दोन हजार चारशे रूपये मिळाला. 

लसणाची आवक बारा ते पंधरा क्विंटल झाली. दर पाच हजार ते दहा हजार मिळाला. हिरव्या मिरचीची पंचवीस ते तीस क्विंटल आवक, तर दर एक हजार ते दोन हजार रुपये, लिंबांची २२ ते ३० क्विंटल, तर दर पाचशे ते एक हजार रुपये, दुधी भोपळ्याची पंचवीस ते पस्तीस क्विंटल आवक, तर दर पाचशे ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल राहिले. मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर, करडीभाजी, कढीपत्ता, आले, मका कणसांनाही चांगली मागणी राहिली.

भुसारमध्ये ज्वारी, तूर, मुग, उडीद, बाजरी, हरभरा, गहू, गुळडागाची आवक झाली. सोयाबीनचीही काही प्रामणात आवक होत आहे. भुसारसह फळांची आवकही स्थिर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...