agriculture news in marathi Ghewda in the state is 1500 to 6500 rupees | Agrowon

राज्यात घेवडा १५०० ते ६५०० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 जुलै 2021

सांगली : येथील शिवाजी मंडईत घेवड्याची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. गुरुवारी (ता. २२) घेवड्याची ५० पिशव्यांची (एक पिशवी २० किलोची) आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला.

सांगलीत प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये

सांगली : येथील शिवाजी मंडईत घेवड्याची आवक कमी अधिक प्रमाणात होत आहे. गुरुवारी (ता. २२) घेवड्याची ५० पिशव्यांची (एक पिशवी २० किलोची) आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला.

मंडईत घेवड्याची आवक कवठेमहांकाळ, मिरज या दोन तालुक्यातून होते. बुधवार (ता. २१) घेवड्याची ४० पिशव्यांची  आवक झाली. त्यास प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. २०) घेवड्याची ४० पिशव्यांची आवक झाली. घेवड्यास प्रतिदहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर होता.

सोमवारी (ता. १९) घेवड्याची ५० पिशव्यांची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बाजारात घेवड्याची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाली असली तरी दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

परभणीत प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी (ता.२०) घेवड्याची (वाल) ८ क्विंटल आवक होती. घेवड्याला प्रतिक्विंटल किमान १५०० ते कमाल २५०० रुपये, तर सरासरी २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील मार्केटमध्ये मागील आठवड्यापासून स्थानिक परिसरातून तसेच नाशिक जिल्ह्यातून घेवड्याची आवक होत आहे. सुरवातीचे काही दिवस १ ते २ क्विंटल आवक होती. त्यावेळी प्रतिक्विंटलला ३००० ते ३५०० रुपये दर होते. मंगळवारी (ता.२०) घेवड्याची ८ क्विंटल आवक झाली. त्यावेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये होते, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२१) घेवड्याची आवक ८८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५००० ते ६५०० रुपये असा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर ५७०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत घेवड्याची आवक कमी झाली आहे. तर, पावसामुळे उठाव कमी आहे. मंगळवारी (ता.२०) घेवड्याची आवक १३० क्विंटल झाली. त्यास ४००० ते ६१०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये होता.

सोमवारी (ता.१९) घेवड्याची आवक ६२ क्विंटल झाली. त्यास ४००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५४०० होता. रविवारी (ता.१७) घेवड्याची आवक १०३ क्विंटल झाली. त्यावेळी ५००० ते ६७०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६००० होता.

शनिवारी (ता.१७) घेवड्याची आवक ६५ क्विंटल झाली. त्यावेळी ३००० ते ६५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० होता. शुक्रवारी (ता.१६) घेवड्याची आवक ११८ क्विंटल झाली. त्यास ५००० ते ६००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ५५०० होता. गुरुवारी (ता.१५) आवक ११० क्विंटल झाली. त्यास ३५०० ते ४५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर ३६०० होता.  पावसामुळे आवक कमी झाली आहे. सध्या उठाव कमी असल्याने दरही स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. सध्या पावसाळ्याच्या दिवसात तोडे कमी होत असल्याने आवकेवर परिणाम झाला आहे.

नगरमध्ये प्रतिक्विंटलला ३००० ते ४००० रुपये

नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याला प्रतिक्विंटल ३ ते ४ हजार रुपये व सरासरी ३ हजार ५०० रुपये दर मिळाला. येथे गेल्या पाच- सहा दिवसांत दर दिवसाला घेवड्याची  ९ ते १२ क्विंटलची आवक होत आहे. 

नगर बाजार समितीत सतत घेवड्याची आवक आणि दरही सतत कमी, जास्त होत आहेत. १९ जुलै रोजी १ क्विंटलची आवक होऊन चार हजार 
रुपयांचा दर मिळाला. १७ जुलै रोजी ३ क्विंटलची आवक होऊन २ हजार ५०० ते ५ हजार व सरासरी ३ हजार ७५० रुपयांचा दर मिळाला. १५ जुलै रोजी २ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ५ हजार रुपये व  सरासरी ४ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. १३ जुलै रोजी २ क्विंटलची ३ हजार ते  ५ हजार सरासरी ४ हजारांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

जळगावात क्विंटलला १६०० ते २६०० रुपये

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता.२२)  घेवड्याची तीन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २६०० व सरासरी २२०० असे होते. आवक नाशिक, औरंगाबाद येथून होत आहे. दर स्थिर आहेत.

सोलापुरात प्रतिक्विंटलला १५०० ते ४००० रुपये

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याला चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही तेजीत राहिले. घेवड्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ४ हजार रुपये इतका दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याची आवक रोज ५ ते १० क्विंटलपर्यंत राहिली. घेवड्याची आवक स्थानिक भागातूनच राहिली. घेवड्याला मागणी टिकून असल्याने दरही तेजीत राहिले.

प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी ३ हजार रुपये आणि सर्वाधिक ४ हजार असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवकेचे प्रमाण असेच प्रतिदिन ५ ते ८ क्विंटल होते. त्यावेळीही दर प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये दर मिळाला. आवक आणि दरातील किरकोळ चढ-उतार वगळता घेवड्याला मागणी असल्याने दर मात्र तेजीत राहिल्याचे सांगण्यात आले.


इतर बाजारभाव बातम्या
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
पुण्यात मागणीअभावी दर कोसळलेपुणे : खरिपातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरळीत सुरू...
सातारा : टोमॅटो, ढोबळी, घेवड्याच्या...सातारा : जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी, सध्या...