Agriculture news in marathi Ghewda in the state is Rs. 1400 to 10 thousand per quintal | Page 2 ||| Agrowon

राज्यात घेवडा १४०० ते १० हजार रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ८) घेवड्याची आवक अवघी ३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३ हजार ते १० हजार रुपये असा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर ८ हजार रुपये होता.

नाशिकमध्ये ३ हजार ते १० हजार रुपयांचा दर 

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ८) घेवड्याची आवक अवघी ३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३ हजार ते १० हजार रुपये असा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर ८ हजार रुपये होता. सध्या होणारी आवक नियमित अवकेच्या तुलनेत खूप कमी असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत घेवड्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे दरात सुधारणा कायम आहे. मंगळवारी (ता. ७) घेवड्याची आवक ५ क्विंटल झाली. त्यास ३,००० ते ७,००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ५,००० रुपये होता. सोमवारी (ता. ६) घेवड्याची आवक ५ क्विंटल झाली. त्यास २,५०० ते ३,२०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २,८०० होता.

रविवारी (ता. ५) घेवड्याची आवक ९ क्विंटल झाली. त्यास ४,००० ते ६,२०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ५,५०० रुपये राहिला.
शनिवारी (ता. ४) घेवड्याची आवक ७ क्विंटल झाली. तिला ३,००० ते ४,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,५०० होता. शुक्रवारी (ता.३) घेवड्याची आवक १० क्विंटल झाली. त्यास १,५०० ते ५,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३,५०० होता. गुरुवारी (ता.२) घेवड्याची आवक १२ क्विंटल झाली. त्यास २,५०० ते ४,००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२०० रुपये होता.

मागील आठवड्यापासून बाजार समितीत घेवड्याची आवक कमी होत आहे. ती सुरुवातीला बरी होती. गेल्या तीन दिवसांत ही आवक कमी झाली. दरही सुधारल्याचे पाहायला मिळाले. सध्या पावसाळ्याच्या दिवसात तोडे कमी होत असल्याने आवकेवर परिणाम झाला आहे. सध्या गुजरात व वाशी मार्केटमध्ये मागणी असल्याने मालाला उठाव आहे. त्यामुळे दरात तेजी असल्याचे पाहायला मिळाले.

कोल्हापुरात ३ ते ५ हजार रूपये दर

कोल्हापूर  : येथील बाजार समितीत घेवड्याची एक ते दोन क्विंटल इतकी आवक होत आहे. त्यास दहा किलोस ३०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. बाजार समितीत  घेवड्याची स्थानिक भागातून आवक होते. 

गेल्या काही दिवसांपासून घेवड्याची आवक स्थिर असल्याची माहिती भाजीपाला विभागाच्या सूत्रांनी दिली. पावसाचे प्रमाण वाढल्याने घेवड्याची काढणी कमी-अधिक होत आहे. त्यामुळे आवकेत सातत्य नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात घेवड्याची आवक वाढली होती. आता यात पंधरा ते वीस टक्क्यांनी घट आल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

नगरमध्ये तीन ते साडेतीन हजार रुपये दर  

नगर  ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत घेवड्याला प्रतीक्विंटल तीन ते साडेतीन हजार व सरासरी ३ हजार २५० रुपयांचा दर मिळाला. बाजार समितीत घेवड्याची दोन क्विंटलची आवक झाली. साधारण आठ ते दहा क्विंटलपर्यंत घेवड्याची आवक होत असते, अशी माहिती मिळाली. 

मंगळवारी (ता. ७) घेवड्याची साडेचार क्विंटलची आवक झाली. त्या वेळी तीन हजार रुपयांचा दर मिळाला. रविवारी (ता. ५) दोन क्विंटलची आवक होऊन चार हजार ते सहा हजार रुपयांचा दर मिळाला. गुरुवारी (ता. २) तीन क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते पाच हजार रुपयांचा, तर सरासरी चार हजार रुपयांचा दर मिळाला. 

२६ जून रोजी तीन क्विंटलची आवक झाली. त्या वेळी तीन ते चार हजार व सरासरी साडेतीन हजार रुपयांचा दर मिळाला. २३ जून रोजी २ क्विंटलची आवक होऊन तीन ते पाच हजार व सरासरी चार हजार रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

सोलापुरात सर्वाधिक २२०० रुपये दर

सोलापूर  ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याची आवक तुलनेने कमीच राहिली. पण, मागणी असल्याने त्याला चांगला उठाव मिळाला. घेवड्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात घेवड्याची आवक रोज २ ते ५ क्विंटल अशीच राहिली. घेवड्याची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. सध्या बाजार समितीमध्ये थेट लिलाव सुरु नाहीत. पण, शेतकरी ते ग्राहक अशीच विक्री सुरु आहे. असे असले तरी मागणीच्या प्रमाणात आवक नाही. त्यामुळे दरात किरकोळ चढ-उतार होत राहिले. तरी दर मात्र स्थिर होते. 

या सप्ताहात घेवड्याला प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही आवक काहीशी अशीच २ ते ४ क्विंटलपर्यंत राहिली. तर, किमान ६०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असा दर मिळाला. त्या आधीच्या सप्ताहातही आवक काहिशी कमीच होती. तर, दर प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा मिळाला.

पुण्यात अडीच ते तीन हजार रुपये दर

पुणे ः श्रावणी घेवड्याचे खरिपातील उत्पादन अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे बाजार समितीमध्ये कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातून आवक सुरू आहे. गुरुवारी (ता. ९) कर्नाटकमधून २ टेम्पो, तर हिमाचल प्रदेशातून ५० गोणींची आवक झाली होती. या वेळी दहा किलोला २५० ते ३०० रुपये दर मिळाले. 

राज्यात अद्याप पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. खरिपातील फळभाज्यांचे उत्पादन सुरू झालेले नाही. यामुळे श्रावणी घेवड्याची प्रामुख्याने आवक ही कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातून होत आहे, असे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले. तर स्थानिक उत्पादन आणि आवकेला एक महिन्याचा कालावधी लागेल, असे नमूद करत होणारी आवक ही ५ ते ६ टेम्पो एवढी राहील, असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये आवक नाही 

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत महिनाभरापेक्षा जास्त काळापासून घेवड्याची (वालशेंग) आवक होत नसल्याची स्थिती आहे.

वालशेंग उत्पादक काकासाहेब दांडगे म्हणाले, ‘‘साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील काही शेतकरी वालशेंगांची लागवड करतात. जुलैच्या मध्यानंतर वालशेंगांची बाजारात आवक होत असते. यंदा पाण्याची उपलब्धता न झाल्याने आपण लागवड करू शकलो नाही. शिवाय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या विक्रीतील अडचणीमुळे शेतकऱ्यांनी आधीच कमी असलेले भाजीपाल्याचे क्षेत्र कमी केले आहे. 

त्यातच वालशेंगांची तुरळक होणारी लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. आमच्यासोबत लागवड करणाऱ्या अनेकांनी क्षेत्र घटविले. ज्यांनी लागवड केली, त्यांच्या वालशेंगा बाजारात येण्यासाठी अजून अवधी आहे. त्यामुळे बाजारात तूर्त वालशेंगांची आवक होत नसल्याची स्थिती आहे.

नागपुरात घेवडा ५० रुपये किलो

नागपूर  : नागपूरच्या कळमणा बाजार समितीत घेवडा आवक अत्यल्प आहे, अशी माहिती समितीतील सूत्रांनी दिली. बाजार समितीच्या दैनंदिन बाजारभावामध्ये दखल घेण्यासारखी देखील आवक नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

किरकोळ बाजारात घेवढ्याला ५० रुपये किलो असा दर मिळत आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर टाळेबंदीमुळे मध्यप्रदेशसह स्थानिक स्तरावरील आवक देखील घटल्याचे सांगण्यात आले. परिणामी, आवक कमी असल्याने किरकोळ बाजारातील दरात तेजी आल्याची माहिती देण्यात आली.

जळगावात १४०० ते २८०० रुपये दर

जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ९) दीड क्विंटल घेवड्याची आवक झाली. आवक नाशिक व लगतच्या भागातून झाली. आवक मागील काही महिन्यांपासून कमीच आहे.

जिल्ह्यात घेवड्याला उठाव नसतो. काही अडतदार घेवड्याचा पुरवठा करून घेतात. जिल्ह्यात घेवड्याचे उत्पादन होत नाही. नाशिक व इतर भागांतून पुरवठा होत असतो. त्याचे दर स्थिर आहेत. आवक पुढे वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
रासायनिक खतांचा योग्य वापर महत्त्वाचापिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे...
मका, सीताफळ, केळी, भाजीपाला पीक सल्ला (...प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्‍त...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
सुपारी, आंबा, नारऴ, काजू फळबाग सल्ला (...ढगाळ व दमट वातावरणामुळे, आंब्याच्या नवीन येणाऱ्या...
राज्यात लिंबं २०० ते १६०० रूपये क्विंटलऔरंगाबादमध्ये क्विंटलला ५०० ते ७०० रुपये दर...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...