घोरपडे कारखान्याची एकरकमी ‘एफआरपी’ जमा

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक ते १५ या जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्याची एकरकमी एफआरपीची २६ कोटी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
Ghorpade factory lump sum ‘FRP’ deposit
Ghorpade factory lump sum ‘FRP’ deposit

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने एक ते १५ या जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्याची एकरकमी एफआरपीची २६ कोटी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती, कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. कारखान्याने तोडणी-वाहतूक बिलेही खात्यांवर जमा केली आहेत. शनिवारपासून (दि.२९)  संबंधितांनी बँकांमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन, कारखाना प्रशासनाने केले आहे.  पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, की जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ८८,१७८ टन उसाची प्रतिटन २,९६० रुपयांप्रमाणे ऊसबिलाची रक्कम २६ कोटी, १० लाख, ६ हजार, ५५४ रुपये होते. त्यापैकी तीन कोटी, ५२ लाख, ५२ हजार, ८११ रुपये  विकास सोसायट्यांच्या कर्ज खात्यावर वर्ग केले आहेत. २२ कोटी, ५७ लाख, ५३ हजार, ७४३ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com