हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन मंडळाकडून अनुदान ः सुनील पवार

GI Rating Important for Hapus Export: Sunil Pawar
GI Rating Important for Hapus Export: Sunil Pawar

रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे ठरू शकते. त्यासाठी जीआय नोंदणीपासून ते जीआय टँगिंग झालेला हापूस विक्री करण्यासाठी किंवा निर्यातीसाठी पणन मंडळाकडून आठशे रुपयांपासून दीड लाखापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्याची तयारी केली आहे, असे प्रतिपादन पणनचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले. 

आंबा उत्पादक संघ आणि पणन मंडळाने आयोजित केलेल्या हापूस आंबा भौगोलिक मानांकन उपयुक्तता कार्यपद्धती या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी डॉ. विवेक भिडे, दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. आर. साळवी, अभिलाष गोऱ्हे, डॉ. संजय भावे, पणनचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, मिलिंद जोशी, बाजार समिती सभापती संजय आयरे यांच्यासह सुमारे दीडशेहून अधिक बागायतदार सहभागी झाले होते. 

यावेळी जीआय मानांकन घेतलेल्या दीडशे आंबा बागायतदारांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी पवार म्हणाले, पणनचा स्वतंत्र विभाग झालेला नाही. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. देशातून विविध आंब्याची निर्यात केली जाते. त्यातील केसरची निर्यात ६० ते ७० टक्के आहे. हापूसची निर्यात दिवसेंदिवस घसरत आहे. याची गांभिर्याने दखल घेतली पाहिजे. इतर जाती निर्यातीसाठी पुढे येत आहेत. 

पाकिस्तानचा आंबा स्वस्त विकला जातो. निर्यात खर्चावर तेथील व्यापाऱ्यांना अनुदान मिळते. एका आंब्याच्या निर्यातीचा खर्च दोनशे रुपये आहे. ७५ टक्के सबसिडी मिळाली तर तो खर्च पन्नास रुपयांपर्यंत येतो. खर्च कमी करण्यासाठी गतवर्षी जहाजमार्गे आंबा पाठविण्यात आला. त्याचा खर्च एका नगाला २५ ते २६ रुपये इतका आला. निर्यात वाढीसाठी नवनवीन प्रयोग सुरू आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com