Agriculture news in Marathi Ginger crop area increased in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात आले पिकाचे क्षेत्र वाढले

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

दरातील तेजी तसेच इतर पिकांना नसलेला अपेक्षित दर यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आले पीक घेण्याकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात सरासरी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर आले लागवड होत असते. यावर्षी मात्र ही लागवड चार हजार हेक्टरवर गेली आहे. यावर्षी दीड हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे.

सातारा ः दरातील तेजी तसेच इतर पिकांना नसलेला अपेक्षित दर यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आले पीक घेण्याकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात सरासरी अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर आले लागवड होत असते. यावर्षी मात्र ही लागवड चार हजार हेक्टरवर गेली आहे. यावर्षी दीड हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे.

जिल्ह्यात कोरेगाव, सातारा, खटाव, कराड, पाटण तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात आले लागवड केली जाते. साधारणपणे या लागवडीसाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतो. मात्र मागील सहा ते सात वर्षांपासून वळीवाच्या पावसाची दडी, कडक ऊन व पाणीटंचाई आदी कारणांमुळे लागवड काळात बदल होत गेला आहे. मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आले लागवडीची कामे उरकली जात आहे.

यावर्षीही या दरम्यान लागवड झाली आहे. २०१४-१५ मध्ये आल्याचे दर प्रतिगाडीस (५०० किलो) ५० हजारांवर गेले होते. या काळात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते. यानंतर दर टप्प्याटप्याने कमी झाले तरी क्षेत्रात वाढच होत गेली आहे. मागील वर्षी प्रतिगाडीस ३५ हजार रुपये दर होते. यंदा मार्च-एप्रिलमध्ये २२ ते २५ हजार रुपये दर होते. या दरम्यानच बियाण्याचे दर राहिले होते. आधुनिक तंत्राच्यावापराने शेतकऱ्यांनी आले पिकाच्या लागवड क्षेत्रात भरीव वाढ केली आहे.

यामुळे सरासरी प्रतिगाडीस २० ते २५ हजार रुपये दर आणि एकरी ३० गाड्याचे उत्पादन मिळाले तरी इतर पिकांच्या तुलनेत जास्त पैसे मिळत असल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या लागवड हंगामात आले लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे तुलनेत बियाण्याचे दर कमी तसेच ‘कोरोना’मुळे सुरू करण्यात आलेल्या लॅाकडाउनमुळे शहरी भागातील लोक गावाकडे आले होते. त्यांचाही आले पीक घेण्याकडे कल राहिला, परिणामी आले पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. माण, फलटण तालुक्यातही आले लागवड वाढली आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...