agriculture news in Marathi, Ginger, cucumber and green chilli rate increased in pune, Maharashtra | Agrowon

पुण्यात आले, काकडी, हिरवी मिरचीच्या दरात सुधारणा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) भाजीपाल्याची आवक सुमारे १६० ट्रक एवढी झाली हाेती. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक सरासरीपेक्षा कमी असल्याने पालेभाज्यांसह विविध भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. यामध्ये प्रामुख्याने आले, काकडी, श्रावणी घेवडा, कांदा, हिरवी आणि सिमला मिरचीचा समावेश आहे. 

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) भाजीपाल्याची आवक सुमारे १६० ट्रक एवढी झाली हाेती. उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याची आवक सरासरीपेक्षा कमी असल्याने पालेभाज्यांसह विविध भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली हाेती. यामध्ये प्रामुख्याने आले, काकडी, श्रावणी घेवडा, कांदा, हिरवी आणि सिमला मिरचीचा समावेश आहे. 

भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून सिमला येथून सुमारे ३ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात ४ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून १२ टेंपाे हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे ५ टेंपो शेवगा आवक झाली हाेती. तर कर्नाटकातून तोतापुरी कैरीची सुमारे ८ टेंपाे आवक झाली हाेती. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोण्या आवक झाली. आग्रा, इंदूर आणि तळेगाव भागातून बटाट्याची सुमारे ४५ ट्रक आवक झाली हाेती.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० गोण्या, टॉमेटो साडेपाच क्रेट, फ्लॉवर सुमारे १५ टेंपो, कोबी १२ टेंपो, तांबडा भोपळा १० ते १२ टेंपो, भेंडी १०, तर गवार प्रत्येकी सुमारे ६ टेंपो, ढोबळी मिरची १२ तर हिरवी मिरची ५ टेंपो, गावरान कैरी १२ टेंपो, तर चिंचेची २५ गोण्या, पावटा ३ टेंपाे काकडी १० टेंपाे, भुईमूग शेंग ६० गाेण्या, गाजर २५० गाेण्या आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : 
कांदा : ७०-८५, बटाटा : १३०-१८०, लसूण : १००-३००, आले : सातारी : ६००-६५०, भेंडी : २००-२५०, गवार : १५०-२५०, टोमॅटो : ४०-६०, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १००-१५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी :१५०-१६०, पापडी : १५०-१६०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ५०-६०, कोबी : ४०-६०, वांगी : १००-२००, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : २५०, गाजर : ७०-१००, वालवर : १६०-२००, बीट : ४०-६०, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ४००-४५०, मटार : परराज्य : ६००, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी : तोतापुरी : १६०, गावरान : १००-१५०, चिंच : (अखंड) : ३००-३२०, फोडलेली : ६००-६५०,  सुरण : २३०-२५०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे १ लाख , तर मेथीची सुमारे ४० हजार जुड्या आवक झाली हाेती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१८००,  मेथी : ५००-१०००, शेपू : ५००-८००, कांदापात : ५००-८००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२५०, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ५००-८००.

फळबाजार
फळबाजारात मोसंबी ४० टन, संत्री १० टन, डाळिंब सुमारे २५ टन, पपई सुमारे १२ टेंपोे, लिंबे सुमारे ५ हजार गोणी, चिकू एक हजार डाग, पेरू ६० क्रेटस्, कलिंगड सुमारे ३० टेंपो, खरबुज २० टेंपो, कर्नाटकमधून आंब्याच्या विविध जातींचे सुमारे २० हजार बॉक्स आणि पेट्या तर रत्नागिरी येथून हापूस आंब्याच्या सुमारे १० हजार पेट्या आवक झाली हाेती. तर गेल्या आठवड्यातील रत्नागिरी हापूसच्या पिकलेल्या सुमारे १५ हजार पेट्या बाजारात उपलब्ध हाेत्या.
फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १६०-३००, (४ डझन) : ६०-१५०, संत्रा : ( ३ डझन) २००-४००, (४ डझन) : १००-२००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश ५-२५ आरक्ता १०-४० कलिंगड : ५-१२, खरबूज : ५-१५, पपई  : ३-१५, चिकू : १००-७००, पेरू (२० किलो) : ३००-४००, आंबा : रत्नागिरी हापूस (४-६ डझन) १८००-२५००, (६-८) २२००-३०००

फुलबाजार 
प्रतिकिलोचे दर - झेंडू : २०-४०, गुलछडी : ८०-१२०, बिजली : ४०-६०, कापरी : २०-३०, ऑस्टर : १४-२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ४०-५०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : ८०-१५०, लिली बंडल : ४-६, जरबेरा : ५०-८०, कार्नेशियन : १५०-२००, मोगरा : २००-४००

मासळी बाजार
रविवारी मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे १४ टन, खाडीची सुमारे दोनशे ते अडीशे किलो, नदीची सुमारे दीड ते दोन टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला सिलन सुमारे १२ टन आवक झाली हाेती. तर विविध मासळीला मागणी वाढल्याने दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली हाेती.  

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १६००, मोठे : १४००, मध्यम : ९००-१०००, लहान : ८००-९०० भिला : ६००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ६५०-७००, रावस-लहान : ६५०,  मोठा : ७५०-८००, घोळ : ६५०, करली : ३२०, करंदी : सोललेली : ३२०, भिंग : २८०, पाला : ६००-१२००, वाम : पिवळी ३६० मोठी ६०० काळी २४०, ओले बोंबील : १६०-२००. कोळंबी ः लहान : २४०,  मध्यम : ३६०, मोठी : ४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १४००, मोरी : २००-३२०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४००. खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : २००-४००, तांबोशी : ४००, पालू : २४०, लेपा : १६०-२००, शेवटे : २४०, बांगडा : लहान : १४०, मोठे : १००-२००, पेडवी : ६० बेळुंजी : १४०, तिसऱ्या : १८०-२०० खुबे : १६० तारली : १२०. नदीची मासळी : रहू : १४०, कतला : १६०, मरळ : लहान : २८०, मध्यम : ४४०, शिवडा : २००, चिलापी : ६०, मागुर : १४०, खवली : १८०, आम्ळी : ६०-१०० खेकडे : १८०, वाम : ५२०. 
मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०. 
चिकन : चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २५०. 
अंडी : गावरान : शेकडा : ६००, डझन : ८४ प्रतिनग : ७. इंग्लिश : शेकडा : ३३० डझन : ४८ प्रतिनग :४ 

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...