agriculture news in Marathi ginger producers got double setback Maharashtra | Agrowon

आले उत्पादकांना दुहेरी फटका 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 मार्च 2021

तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टी, पूर व अवकाळीमुळे आले पिकाची कुज, करपा रोगांमुळे आर्थिक नुकसान झाले.

कडेगाव, जि. सांगली ः तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टी, पूर व अवकाळीमुळे आले पिकाची कुज, करपा रोगांमुळे आर्थिक नुकसान झाले. त्यातच केवळ १२ ते १३ रुपये किलो असा कमी भाव व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. खर्चही निघत नसल्याने आले उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. 

तालुक्‍यात यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत आले पिकाची मे व जून महिन्यांत मोठ्या प्रमाणात लागवड केली. शेती मशागत, ठिबक सिंचन, हजारोंचे शेणखत तर महागडे बियाणे घेत एकरी तब्बल अडीच-तीन लाख रुपये खर्च केले. सुरुवातीला निसर्गाने चांगली साथ दिली. लागवड करताना मे व जून महिन्यात आले पिकास पोषक वातावरण राहिले. त्यानंतर बदलते हवामान व मुसळधार पावसाचा फटका बसला. लाखो रुपये खर्च करून आले पिकाची केलेली लागवड जादा पाऊस व उष्ण वातावरणामुळे कुज होऊ लागल्याने संकटात आली. 

ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तालुक्‍यासह जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. कधी मुसळधार पाऊस, कधी अतिवृष्टी यामुळे तालुक्‍यातील येरळा व नांदणी या नद्यांसह, सर्व तलाव, ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. तर सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. पूर व अतिवृष्टीचे पाणी शेतात साचून राहिल्याने आल्याची मोठ्या प्रमाणात कुज होण्यास सुरुवात झाली. बदलत्या वातावरणाचा फटकाही आल्याला बसला. 

भरपाईची मागणी 
आले पिकाला उतरत्या दराचा सामना करावा लागत आहे. प्रतिकिलो १२ ते १३ रुपये दर मिळत आहे. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. खर्च केलेली रक्कम कशी वसूल होणार व पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शासनाने पाहणी करून मदत करावी, अशी मागणी आहे. 

प्रतिक्रिया
या वर्षी आले पिकाला नीचांकी भाव मिळत आहे. नवीन लागवडही अत्यल्प होत आहे. परिणामी, बियाण्यासाठीही या वर्षी विशेष मागणी नाही. 
- दीपक शेडगे, कडेगाव, जि. सांगली 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...