कापूस उत्पादन घटल्याने जिनिंग व्यवसाय एका शिफ्टमध्ये

सोळा वर्षांत पहिल्यांदाच कपाशीच्या कमी उत्पादकतेच्या कारणामुळे जिनिंग व्यवसाय अडचणीत आहे. कापसाची आवक घटली आणि विजेचे दर वाढल्याने हे संकट अधिक गडद झाले आहे. - बाळासाहेब निलावार, संचालक, बालाजी जिनिंग अँड प्रेसिंग, आर्णी
कापूस उत्पादन घटल्याने जिनिंग व्यवसाय एका शिफ्टमध्ये
कापूस उत्पादन घटल्याने जिनिंग व्यवसाय एका शिफ्टमध्ये

आर्णी, यवतमाळ : पहिल्याच वेचणीत कपाशीचे उत्पादन घटले. त्याचा फटका शेतकऱ्यांसह जिनिंग मालकांनाही बसला आहे. जिनिंग दोनऐवजी एकाच शिफ्टमध्ये चालवावे लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आर्णी तालुक्‍यात जिनिंगची संख्या सर्वाधिक आहे. परंतु गेल्या वर्षी गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. त्याचा या तालुक्‍यातील जिनिंग व्यवसायालाही फटका बसला. या वर्षी दुष्काळामुळे उत्पादकता घटली. त्यामुळे जिनिंग व्यवसाय पुन्हा अडचणीत आला आहे. 

या व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजूर, हमाल व इतरांनाही याचे चटके  बसत आहेत. सोबतच जागतिक  बाजारपेठेत रुईगाठीला भाव नाही. त्यामुळे जिनिंगला दहा वर्षांच्या काळात पहिल्यांदाच नुकसान सोसावे लागत आहे, असे स्वस्तिक जिनिंगचे संचालक गोपाल कोठारी यांनी सांगितले. 

मानुदास जिनिंगचे संचालक रंजित राठोड म्हणाले, ‘‘कपाशीची आवक कमी असल्याने दोन शिफ्टमधील व्यवसाय आता एकाच शिफ्टपुरता मर्यादित झाला आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com