मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
पुण्यातील पाणी, वाहतुकीचे प्रश्न सोडवणार ः खासदार गिरीश बापट
पुणे ः येत्या पाच वर्षांत पुण्याचा चेहरामोहरा बदलू. पाणी, वाहतुकीचे प्रश्न सर्वांना एकत्र घेऊन सोडवू. त्यासाठी योग्य नियोजन व अंमलबजावणी करू, असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले.
शुक्रवारी (ता. २४) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बापट बोलत होते. भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, विजय काळे, महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.

श्री. बापट म्हणाले, ‘‘ही माझी अकरावी निवडणूक आहे. ज्या वेळेस मी उमेदवार असतो त्या वेळेस कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार अंदाज बांधतो. या निवडणुकीसाठी मतदान झाले त्या दिवशी सहा लाख मतांचा अंदाज होता. मतमोजणी झाल्यानंतर सहा लाखांवर मते मिळाली. निवडणुकीपूर्वी पुणे शहरासाठी जाहीरनामा तयार केला आहे. त्यासाठी आम्ही बांधील आहे. भामा आसखेड पुनर्वसनाचा प्रश्न, पुण्याच्या पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. पाण्यासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिकेने निधीची तरतूद केली आहे. पुरंदर विमानतळ, रेल्वे, चांदणी चौकातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
‘शिरूर, बारामतीसाठी प्रयत्न कमी पडले’
शिरूर, बारामतीसाठी माझे प्रयत्न कमी पडले. कारण मी निवडणूकीच्या कामात व्यस्त होतो. मात्र, आमची संघटना काम करत होती. आमचे बालेकिल्ले आहेत. तसेच राष्ट्रवादी, कॉंग्रेसचेही आहेत. त्यामुळे आम्ही पुढील काळात या बालेकिल्ल्यात प्रयत्न करू.
- 1 of 1029
- ››