सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या पाट्यांवर मुलींचे नाव

girl name plate
girl name plate

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत जिल्हा परिषद व येवला पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेक वाचवा,`लेक शिकवा’ या उपक्रमांतर्गत येवल्यात स्त्रीशिक्षणाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमात ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या उपक्रमांतर्गत ‘करूया सन्मान लेकीचा’ या मुलींच्या नावाच्या पाट्या घरांवर लावण्याचा प्रारंभ नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, प्रत्येक मुलीने आयुष्यात भरपूर शिक्षण घेतले पाहिजे. खूप मोठ्या पदावर जाऊन आपले भविष्य उज्ज्वल करू शकाल. स्वतःचे रक्षण स्वतः ला करता येणे, ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी आपण आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. उपक्रमाच्या माध्यमातून मुलीच्या नावाची पाटी मुख्य दरवाजावर लावून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ३३०० शाळांमधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्वांना मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन या वेळी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांनी केले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख उपस्थित होते. या वेळी विद्यार्थिनींना हुंडाबंदीची शपथ देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com