agriculture news in Marathi girls name plate mission in Nashik Maharashtra | Agrowon

सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या पाट्यांवर मुलींचे नाव

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 जानेवारी 2020

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत जिल्हा परिषद व येवला पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेक वाचवा,`लेक शिकवा’ या उपक्रमांतर्गत येवल्यात स्त्रीशिक्षणाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमात ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या उपक्रमांतर्गत ‘करूया सन्मान लेकीचा’ या मुलींच्या नावाच्या पाट्या घरांवर लावण्याचा प्रारंभ नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत जिल्हा परिषद व येवला पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेक वाचवा,`लेक शिकवा’ या उपक्रमांतर्गत येवल्यात स्त्रीशिक्षणाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमात ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या उपक्रमांतर्गत ‘करूया सन्मान लेकीचा’ या मुलींच्या नावाच्या पाट्या घरांवर लावण्याचा प्रारंभ नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, प्रत्येक मुलीने आयुष्यात भरपूर शिक्षण घेतले पाहिजे. खूप मोठ्या पदावर जाऊन आपले भविष्य उज्ज्वल करू शकाल. स्वतःचे रक्षण स्वतः ला करता येणे, ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी आपण आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

उपक्रमाच्या माध्यमातून मुलीच्या नावाची पाटी मुख्य दरवाजावर लावून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ३३०० शाळांमधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम सर्वांना मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन या वेळी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांनी केले.

या वेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख उपस्थित होते. या वेळी विद्यार्थिनींना हुंडाबंदीची शपथ देण्यात आली.


इतर ग्रामविकास
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
गावातच होणार शेती नियोजनगावच्या शेतीचे नियोजन आता गावातच होणार आहे. कृषी...
लोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...
मावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...
शेती, जलसंधारण, ग्रामविकासामधील ‘दिलासा‘ग्रामीण भागातील वंचित घटकांचा उत्कर्ष नजरेसमोर...
दर्जेदार डाळिंबाची खांजोडवाडीखांजोडवाडी (ता.आटपाडी,जि.सांगली) दुष्काळी...
जैवविविधता, कृषी अन् शिक्षणाचा जागरबत्तीस शिराळा (जि.सांगली) या तालुक्यातील युवकांनी...
लोकसहभागातून दुष्काळावर केली मात कोठली (जि.नंदुरबार) गावातील पाणीटंचाई...
पुणेवाडीचे शिवार एकीतून झाले पाणीदारपुणेवाडी (ता. पारनेर, जि.नगर) या पठारावरील...
तंत्रज्ञानावर आधारीत शेतीतून लाखेगावची...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावातील शेतकऱ्यांनी...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
‘कोरडवाहू‘ला दिशा देण्यासाठी संस्था...कोरडवाहू क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी...
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...