गिरणा धरणातील साठा नऊ टक्क्यांवरच

गिरणा धरणातील साठा नऊ टक्क्यांवरच
गिरणा धरणातील साठा नऊ टक्क्यांवरच

जळगाव : जिल्ह्यातील २१ हजार हेक्‍टर क्षेत्राला पाणी देणाऱ्या गिरणा धरणातील साठा नऊ टक्‍क्‍यांवरच अाहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

पावसाची स्थिती मागील वर्षापेक्षा बरी असल्याने गिरणा धरण यंदाही भरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सापुतारा, मालेगाव व नाशिकच्या पूर्व भागात फारसा पाऊस नाही. गिरणा नदीवर गिरणा धरणासह मागे चणकापूर, ठेंगोडा बंधारा, हरणबारी आदी प्रकल्पही असून, त्यामध्येही फारसा साठा नाही. हे प्रकल्प भरल्यानंतर गिरणामध्ये पाणी येईल. त्याचा लाभ चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोल या तालुक्‍यांना होतो. इतर लहान नद्यांमध्येही या धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून सोडता येते. परंतु, नदीलाच चांगला पाण्याचा प्रवाह आलेला नाही. रब्बी हंगामात व पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाचा मोठा आधार असल्याने शेतकऱ्यांमध्ये गिरणा धरण भरण्याची अपेक्षा आहे.

सातपुडा पर्वतातील प्रकल्पांची स्थितीही अशीच आहे. धुळे व चोपडा या भागातील शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या अनेर धरणातही २० टक्केच साठा आहे. रावेरातील सुकी, अभोरा, मंगरूळ, गारबर्डी, प्रकल्पातही ४० टक्‍क्‍यांपेक्षा कमी जलसाठा आहे. यावलमधील मोर प्रकल्पातही फक्त २५ टक्के साठा आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com