‘गिरणा’ ठरणार जळगाव जिल्ह्यातील रब्बीला आधार

जळगाव : जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नांदगाव (जि. नाशिक) येथील गिरणा धरणातील साठा १३ टीएमसीपर्यंत पोचला आहे. हे धरण ७० टक्के भरले आहे.
 The 'Girna' will be the base of the rabbi in Jalgaon district
The 'Girna' will be the base of the rabbi in Jalgaon district

जळगाव : जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नांदगाव (जि. नाशिक) येथील गिरणा धरणातील साठा १३ टीएमसीपर्यंत पोचला आहे. हे धरण ७० टक्के भरले आहे. धरणात मुबलक जलसाठा झाल्याने पुढे रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांना या धरणातून आवर्तन मिळेल, असे स्पष्ट झाले आहे.

ेगिरणा धरण जळगावच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १०० टक्के जलसाठा झाला होता. यंदा ऑगस्टच्या मध्यानंतर या धरणातील जलसाठा वाढला. तो गुरुवारी (ता.२७) ७० टक्क्यांवर पोचला. त्याची साठवण क्षमता १८.४८ टीएमसी एवढी आहे. जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यातील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्राला या धरणातील पाण्याचा लाभ होतो.

गेल्या हंगामात या धरणातून तीनदा रब्बीसाठी पाणी मिळाले होते. तर यंदाही रब्बीसाठी तीनदा आवर्तन मिळेल, याची हमी झाली आहे. यासंदर्भात कालवा समितीची बैठक ऑक्टोबरमध्ये होईल. यानंतर पाणी वाटपासंबंधीचे निर्णय प्रशासन जाहीर करील. कोरडवाहू कापूस पिकालाही पुढे सिंचन करता येईल. यामुळे जिल्ह्यात कोरडवाहू कापसाचे चांगले उत्पादन येऊ शकेल. तसेच हरभरा, ज्वारी, बाजरी ही पिके घेता येतील. ज्वारीसाठी पाचोरा, भडगावचा परिसर प्रसिद्ध आहे.

धरणातील आवकेत घट

या धरणावर नाशिक जिल्ह्यातील मनमाड, जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या पालिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यादेखील आहेत. या पालिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील दूर झाली आहे. पाचोरा, भडगाव, एरंडोल, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव या तालुक्यांमधील सुमारे १२५ गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील दूर होणार आहे. धरणातील आवक गेल्या दोन दिवसांत कमी झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com