agriculture news in Marathi give 50 percent incentive over banana transport Maharashtra | Agrowon

केळी वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत द्यावी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

‘व्हीपीयू’ प्रकारच्या रेल्वेच्या केळी वॅगन्स भाड्यात रेल्वेने ५० टक्के सवलत दिली तर जानेवारी-फेब्रुवारीत रेल्वेने पुन्हा एकदा केळी वाहतूक सुरू करण्याबाबत विचार करता येईल.

रावेर, जि. जळगाव : ‘व्हीपीयू’ प्रकारच्या रेल्वेच्या केळी वॅगन्स भाड्यात रेल्वेने ५० टक्के सवलत दिली तर जानेवारी-फेब्रुवारीत रेल्वेने पुन्हा एकदा केळी वाहतूक सुरू करण्याबाबत विचार करता येईल, असा प्रस्ताव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता.१६) रेल्वे प्रशासनापुढे ठेवला आहे. 

रेल्वे प्रशासनाने या सर्व शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी बंद पडलेली रेल्वेची केळी वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी तालुक्यातील वाघोदा येथील ज्येष्ठ केळी उत्पादक शेतकरी डी. के. महाजन यांच्या फार्महाऊसवर दुपारी बैठक झाली. या बैठकीत अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, डी. के. महाजन, कडू धोंडू चौधरी, हरीश गनवाणी, मोहन भिका पाटील, राहुल पाटील, किशोर पाटील, नरेश सुखेजा हे केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते.

भाड्यात अनुदान मिळावे
‘व्हीपीयू’ प्रकारच्या केळी वॅगन्सच्या भाड्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ५० टक्के अनुदान दिल्यास जानेवारी-फेब्रुवारीत सुरू होणाऱ्या नव्या हंगामात रेल्वे वॅगन्स केळी भरून पाठविण्याबाबत विचार करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.}

कापणी योग्य केळीचा अभाव
सध्या कापणी योग्य केळीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच रेल्वेने दिल्ली येथे केळी पाठवली तर तेथील काही खरेदीदार व्यापारीही गेल्या सात-आठ वर्षात अन्य व्यवसायाकडे वळले आहेत.त्यामुळे रेल्वेने केळी पाठवण्याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा अशी चर्चा या केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये झाली.

रेल्वेने केळी पाठवण्यात अनेक अडचणी
सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी रेल्वे वॅगन्सने दिल्ली आणि कानपूर येथे केळी पाठवण्यात येत होती. मात्र अलीकडे केळी बागेतून थेट व्यापाऱ्यांच्या गोदामात ट्रकद्वारे केळी पोचते. त्यामुळे रेल्वेने केळी पाठवण्याबाबत शांतपणे निर्णय घ्यावा लागणार आहे. रेल्वेने केळी पाठवायचे झाल्यास केळी बागेतून स्थानिक रेल्वे स्थानकावर आणि दिल्ली रेल्वे स्थानकावरून पुन्हा व्यापाऱ्यांच्या गोदामात वाहतूक करावी लागेल. यामुळे पुन्हा-पुन्हा केळीची उचल - ठेव करावी लागणार आहे. यातून हमाली खर्च तर वाढणारच आहे, पण जादा हाताळणीमुळे केळीच्या दर्जावर ही परिणाम होऊ शकेल. या ऐवजी थेट केळी बागेतून ट्रकद्वारे व्यापाऱ्यांच्या गोदामापर्यंत केळी पाठविणे सोयीस्कर आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...