agriculture news in Marathi give 50 rupees subsidy for milk powder Maharashtra | Agrowon

दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्या : विनायकराव पाटील

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

कोरोना सारख्या साथीत प्रचंड अडचणीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधास प्रती लिटर २५ रुपये खरेदी दर राज्य शासनाने दिला आहे. याबद्दल राज्यातील सर्व दूध उत्पादक संघांच्याकडून महाविकास आघाडी शासनाचे आभार व्यक्त होत आहेत.

इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत प्रचंड अडचणीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधास प्रती लिटर २५ रुपये खरेदी दर राज्य शासनाने दिला आहे. याबद्दल राज्यातील सर्व दूध उत्पादक संघांच्याकडून महाविकास आघाडी शासनाचे आभार व्यक्त होत आहेत. आता सर्व दूध संघांना शासनाने दूध पावडर निर्यातीस परवानगी द्यावी तसेच निर्यात होणाऱ्या दूध पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी अध्यक्ष व येथील राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केली.

विनायकराव पाटील म्हणाले की, सध्या कोरोनाच्या महामारीमुळे दूध उत्पादक व संपूर्ण दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या काळात महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांना गाईच्या दुधास प्रतिलिटर २५ रुपये खरेदी दर देऊन मोठा हातभार लावला आहे. गेल्या कित्येक वर्षात सहकारी दूध संघांना प्रथमच या शासनाने या द्वारे मदतीचा हात दिला आहे. हे शासन सहकार चळवळ टिकवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या निर्णयातून सिद्ध होत आहे.

या बद्दल महाविकास आघाडी सरकारचे सर्व सहकारी दूध संघांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक कृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. या बरोबरच राज्य शासनाने दूध पावडर निर्यातीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे अशी मागणीही आम्ही सहकारी दूध संघाच्या वतीने शासनाकडे करीत 
आहोत.


इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...