agriculture news in Marathi give 50 thousand subsidy for regular loner Maharashtra | Agrowon

नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे अनुदान : भाजप

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला दिलासा देण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. त्यासोबतच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे.

गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला दिलासा देण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. त्यासोबतच नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे, अशी मागणी भाजपतर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना करण्यात आली आहे. 

सडकअर्जुनी उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भाने निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहिर करावे. ग्रामीण भागात रोजगाराची उपलब्धता नसल्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामे त्वरित सुरु करण्यात यावी. घरकुल बांधकामासाठी वाळूची उपलब्धता करावी. ग्रामीण भागातील घरगुती व कृषीचे वीजबिल माफ करावे.

स्वस्त धान्य दुकानातून चांगल्या प्रतीच्या अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात याव्यात. बाहेरी राज्य व जिल्हयातून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्‍वारंटाईन करुन ठेवण्यासाठी व्यवस्था करावी. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेत थकीत कर्जदारांचा विचार करण्यात आला.

परंतू नियमीत कर्जदारांना कोणत्याच प्रकारचा दिलासा या कर्जमाफी योजनेत दिलेला नाही. त्यामुळे नियमीत कर्जदारांना ५० हजार रुपयांचे अनुदान त्वरित देण्यात यावे, अशी मागणी देखील भाजपने केली आहे. 

शिष्टमंडळात सडकअर्जुनी तालुकाध्यक्ष अशोक लंजे, राजेश कठाणे, शिशिर येडे, चेतना वडगाये, गीता कापगते, प्रशांत शहारे यांचा समावेश होता. 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...