agriculture news in marathi, give 50,000 compensation bollworm victims | Agrowon

'बोंड अळी नुकसानग्रस्तांना स्वनिधीतून एकरी ५० हजार भरपाई द्या'
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई, प्रतिनिधी : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफ, पीकविमा, कापूस बियाणे नियंत्रण कायदा अशा विविध माध्यमांतून सरकारने हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर केली. मात्र संबंधित यंत्रणांनी हात वर केल्याने कापूस उत्पादकांना एकरी दीड हजारांपेक्षा अधिक मदत मिळणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने कापूस उत्पादकांना एकरी ५० हजार रुपये मदत स्वनिधीतून द्यावी, तसेच ती रक्कम संबंधित यंत्रणांकडून स्वतंत्रपणे वसूल करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंबई, प्रतिनिधी : गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एनडीआरएफ, पीकविमा, कापूस बियाणे नियंत्रण कायदा अशा विविध माध्यमांतून सरकारने हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदत जाहीर केली. मात्र संबंधित यंत्रणांनी हात वर केल्याने कापूस उत्पादकांना एकरी दीड हजारांपेक्षा अधिक मदत मिळणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने कापूस उत्पादकांना एकरी ५० हजार रुपये मदत स्वनिधीतून द्यावी, तसेच ती रक्कम संबंधित यंत्रणांकडून स्वतंत्रपणे वसूल करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

श्री. मुंडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. बोंड अळीमुळे राज्यातील ९० टक्के क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत फसवी असल्याचा आरोप श्री. मुंडे यांनी पत्रात केला आहे.

शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजपैकी हेक्टरी ८ हजार रुपये पीकविमा योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार होते. हेक्टरी १६ हजार रुपये हे कापूस बियाणे नियंत्रण कायद्याच्या माध्यमातून देण्यात येणार होते. वास्तविक खरीप हंगामात फक्त ५ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक उत्पादकांनीच पीकविमा घेतला आहे. त्यामुळे ३० लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस उत्पादकांना या पॅकेजमधील पीकविम्यापोटी मिळणाऱ्या ८ हजार रुपये प्रति हेक्टरी मदतीचा फायदा मिळू शकणार नाही, हे श्री. मुंडे यांनी लक्षात आणून दिले.

 

इतर ताज्या घडामोडी
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...