शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून द्यावेत : राज्यमंत्री तनपुरे

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता शेतकऱ्यांना हप्ते बांधून द्यावेत. तसेच पाणी पुरवठ्याचे व स्ट्रीट लाइटचे कोणतेही वीज कनेक्शन तोडू नये अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून द्यावेत : राज्यमंत्री तनपुरे
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून द्यावेत : राज्यमंत्री तनपुरे

पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण आहे. महावितरण ही सरकारी कंपनी आहे व सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता शेतकऱ्यांना हप्ते बांधून द्यावेत. तसेच पाणी पुरवठ्याचे व स्ट्रीट लाइटचे कोणतेही वीज कनेक्शन तोडू नये अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या. इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे महावितरणच्या वतीने उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. १४) ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते व खासदार सुप्रिया सुळे व वनविभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी पुणे जिल्हा विद्युत वितरण समितीचे सदस्य स्वप्नील सावंत, इंदापूर विद्युत वितरण समितीचे तालुका अध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, वैशाली पाटील, सागर मिसाळ, हनुमंत कोकाटे, प्रतापराव पाटील, सतीश पांढरे, विष्णू पाटील, सचिन खामगळ, शुभम निंबाळकर, सारिका लोंढे, सरपंच शिवाजी कन्हेरकर उपस्थित होते. राज्यमंत्री भरणे म्हणाले, की ज्या शेतकऱ्यांकडे आर्थिक तरतूद आहे त्यांनी वीजबिल भरावे. परंतु ज्याकडे आर्थिक तरतूद नाही अशा शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीने हप्ते बांधून द्यावेत व वीज तोडू नये. कोरोनाचे संकट असतानाही खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे तालुक्याला निधीची कमतरता भासली नाही. पुणे जिल्हा परिषदेतील कामांमुळेच राज्यमंत्री भरणे आमदार झाले. इंदापूर तालुक्यातील विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्‍वासन खासदार सुळे यांनी या वेळी दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com