agriculture news in marathi Give Bill payment installment to farmers Says state energy minister Prajakt Tanpure | Page 4 ||| Agrowon

शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून द्यावेत : राज्यमंत्री तनपुरे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता शेतकऱ्यांना हप्ते बांधून द्यावेत. तसेच पाणी पुरवठ्याचे व स्ट्रीट लाइटचे कोणतेही वीज कनेक्शन तोडू नये अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.

पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण आहे. महावितरण ही सरकारी कंपनी आहे व सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता शेतकऱ्यांना हप्ते बांधून द्यावेत. तसेच पाणी पुरवठ्याचे व स्ट्रीट लाइटचे कोणतेही वीज कनेक्शन तोडू नये अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.

इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथे महावितरणच्या वतीने उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. १४) ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते व खासदार सुप्रिया सुळे व वनविभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी पुणे जिल्हा विद्युत वितरण समितीचे सदस्य स्वप्नील सावंत, इंदापूर विद्युत वितरण समितीचे तालुका अध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, वैशाली पाटील, सागर मिसाळ, हनुमंत कोकाटे, प्रतापराव पाटील, सतीश पांढरे, विष्णू पाटील, सचिन खामगळ, शुभम निंबाळकर, सारिका लोंढे, सरपंच शिवाजी कन्हेरकर उपस्थित होते.

राज्यमंत्री भरणे म्हणाले, की ज्या शेतकऱ्यांकडे आर्थिक तरतूद आहे त्यांनी वीजबिल भरावे. परंतु ज्याकडे आर्थिक तरतूद नाही अशा शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीने हप्ते बांधून द्यावेत व वीज तोडू नये. कोरोनाचे संकट असतानाही खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे तालुक्याला निधीची कमतरता भासली नाही.
पुणे जिल्हा परिषदेतील कामांमुळेच राज्यमंत्री भरणे आमदार झाले. इंदापूर तालुक्यातील विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्‍वासन खासदार सुळे यांनी या वेळी दिले.

 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...
नगर जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांना...नगर ः राज्य सरकारच्या धोरणानुसार महात्मा जोतिराव...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘बळिराजा’च्या...सांगली : ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, ‘या...
सरकारने कोंबड्या जगविण्यासाठी शेतकरी...यवतमाळ : केंद्र सरकारने कोंबड्यांना खाद्य...
अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे......सोमेश्‍वरनगर, जि. पुणे : ‘एकाही पानावर स्पॉट नाही...
विजेअभावी पिकांना पाणी देण्यास अडचणी नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले,...
जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडीचा खडसेंचा...जळगाव ः जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या...जळगाव : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा...
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवरसोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६...
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा...बहुतांश द्राक्ष बागांमध्ये सध्या फळछाटणी पूर्ण...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला...सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या...
नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने...नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना...
अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५३ पैसेअकोला : जिल्ह्यात या वर्षी झालेला अनेकदा...
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी...
रत्नागिरी तालुक्यात भाताच्या लोंबीत...रत्नागिरी : फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार...
देगलूर-बिलोलीची निवडणूक ‘महाविकास’च्या...नांदेड : देगलूर - बिलोली विधानसभा निवडणुकीत...
ऊसबिलातून वीजबिल कपातीच्या आदेशाची...नगर : शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांनी...