Agriculture news in Marathi Give a bonus of Rs.1000 to Dhana; Demand to the Chief Minister | Agrowon

धानाला १००० रुपये बोनस द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

निविष्ठांच्या दरात झालेली वाढ, कीड रोगामुळे घटलेली उत्पादकता याची दखल घेत धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे १००० रुपये देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे.

भंडारा : निविष्ठांच्या दरात झालेली वाढ, कीड रोगामुळे घटलेली उत्पादकता याची दखल घेत धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे १००० रुपये देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे.

भंडारा जिल्हा धानाचे आगर म्हणून ओळखला जातो. त्यातही तुमसर तालुक्यात धान लागवडीखाली क्षेत्र सर्वाधिक आहे. या हंगामात सुरुवातीला पावसाने खंड दिला. परिणामी लागवडीला उशीर झाला. त्यामुळे आधीच उत्पादकता प्रभावित होणार असल्याचे असतानाच त्यानंतरच्या काळात अतिवृष्टी आणि महापुराचा फटका धानाला बसला. यातून सावरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला असता परतीच्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

 कधी कोरडा तर कधी ओला तर कधी अतिवृष्टी अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक जेरीस आला आहे अशा काळात पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खत, औषधी, मजुरी, कापणी, या खर्चातही वाढ होते. केंद्र सरकारने १८६८ रुपयाचा आणि भाव धानाला जाहीर केला आहे. यातून उत्पादन खर्चाची भरपाई देखील शक्य नाही. त्यामुळे धानाला गेल्या हंगामातील पाचशे रुपयांऐवजी १००० रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

गेल्या हंगामात पाचशे रुपये बोनस आणि दोनशे रुपये सानुग्रह अनुदान याप्रमाणे सातशे रुपयांची मदत धान उत्पादकांना शासनाने जाहीर केली होती. या हंगामात स्थिती अत्यंत विदारक असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी आहे. हमीभाव केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील शासनाकडून करण्यात आली होती. परंतु  तुमसर तालुका आणि जिल्ह्यात अद्याप एकही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्याबाबत देखील तत्काळ निर्णय व्हावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केली आहे. मागण्यांचा विचार न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...