Agriculture news in marathi Give crop loans, forgive electricity bills, demand of Rayatkranti organization | Agrowon

पीककर्ज द्या, वीजबिल माफ करा, रयतक्रांती संघटनेची मागणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

सोलापूर  ः शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करुन नवीन पीककर्ज द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने लवकरच पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे.

सोलापूर  ः शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करुन नवीन पीककर्ज द्यावे, शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, ऊसखरेदी दरात वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने लवकरच पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली. 

दुष्काळ, गारपीठ आणि लॅाकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशा काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. परंतु, सरकारने अद्याप कोणतीही भरीव अशी मदत केली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. लॅाकडाऊनने बाजारपेठा बंद आहेत. त्याचा परिणाम शेतमाल विक्रीवर होतो आहे. आहे तिथे विकावा, तरी दर मिळत नाही, अशा कोंडीत शेतकरी अडकला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना थेट मदतीची गरज आहे, अशी मागणी भोसले यांनी केली. 

जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मिळालेला आहे त्यांना नवीन कर्जही मिळालेले नाही. यावर तातडीने निर्णय व्हावा, शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु करावे, आदी आमच्या मागण्या आहेत. सध्या या सर्व प्रश्नावर आंदोलनाची भूमिका आम्ही घेतली आहे. लवकरच राज्यभर आम्ही हे आंदोलन छेडू, असेही भोसले म्हणाले.  

 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...