पीककर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रार

सोलापूर : पीककर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न करणाऱ्या बँकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे दिली.
Give crop loans, otherwise report to the police
Give crop loans, otherwise report to the police

सोलापूर : पीककर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न करणाऱ्या बँकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे दिली.

सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक बँकेस पीककर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. पण बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. शासकीय नियमानुसार पीककर्ज वितरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुद्ध पोलिस तक्रार करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार तक्रार नोंदवण्याची कारवाई केली जाईल, असे श्री शंभरकर यांनी सांगितले.

खरीप हंगाम सुरू होऊन सुमारे एक महिना झाला आहे. सोलापूर जिल्ह्यास एकूण १४३८.५२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. ३० जूनअखेर ६४८.८८ कोटी पीक कर्जाचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३० जूनअखेर पीककर्ज वाटपात वाढ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या ४५ टक्केच वाटप झाले आहे. हे वाटप जास्तीत जास्त व्हावे, यासाठी बँकाकडे पाठपुरावा केला जात आहे. या बाबत उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पत्राद्वारे सूचना दिली आहे. आता मात्र कोणाचेही ऐकून घेतले जाणार नाही. थेट पोलिसांकडे तक्रार केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीयीकृत बँकांचाच खोडा राष्ट्रीयीकृत बँकाचा यामध्ये आखडता हात दिसत आहे. त्यातही बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया यांसह काही प्रमुख बँकांचा समावेश आहे. तर कार्पोरेट आणि काही शेड्युल्येड बँकांनी मात्र दिलेल्या उद्दिष्टांपेक्षाही कर्ज वितरण केले आहे. त्यात आयसीआयसीआय बँकेने १६६.२६ टक्के तर एचडीएफसी बँकेने ९९.४६ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com