पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदतवाढ द्या ः वडेट्टीवार

पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना  एक महिन्याची मुदतवाढ द्या ः विजय वडेट्टीवार
पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदतवाढ द्या ः विजय वडेट्टीवार

मुंबई ः खरीप हंगामातील पीक विमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पीक विमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

पीक विम्यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या समाधानकारक पावसाअभावी अनेक भागात कमी प्रमाणात झालेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात हा पेरा ५० टक्केही झालेला नाही तर काही भागात पेरण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. समाधानकारक पावसाअभावी शेतकरी संकटात आहे. तसेच पीक कर्जाचे वाटप देखील सद्यस्थितीत ५० टक्क्यांहून कमी झालेले असल्यामुळे पीक विमा हप्ता भरण्यास शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. राज्यातील लाखो शेतकरी अजनूही पीक विम्याचा हप्ता भरण्यापासून वंचित आहेत. जुलै महिन्याअखेरीस पीक विमा भरण्याची मुदत संपत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही हे लक्षात घेऊन त्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून द्यावी, अन्यथा मोठ्या संख्येने शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहतील. 

विदर्भात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भात (धान) उत्पादक शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा फक्त धानपिकाची लावणी झाल्यानंतरच स्विकारला जातो. रोपे (पऱ्हे) टाकल्यानंतर पीक विमा लागू करणे आवश्यक असताना धान (भात) या एकमेव पिकासाठी हा जाचक नियम लावल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने पीक विम्याच्या लाभापासून वंचित रहात आहेत. हा निकष बदलून रोपे (पऱ्हे) टाकल्यापासूनच पीक विमा लागू करावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com