agriculture news in marathi give four thousand rupees rate for sugarcane sangli maharashtra | Agrowon

उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा : रघुनाथदादा पाटील

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

सांगली  ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. ऊसदराबाबत सांगलीत १२ डिसेंबरला संघटनेची परिषद होईल, असेही त्यांनी सांगितले.

सांगली  ः राज्यातील ऊस उत्पादकांना प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. ऊसदराबाबत सांगलीत १२ डिसेंबरला संघटनेची परिषद होईल, असेही त्यांनी सांगितले.

सांगली येथे शुक्रवारी (ता. २२) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पाटील बोलत होते. ते म्हणाले, की राज्यातील कोणतीही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची बाजू घेण्याच्या मनःस्थितीत नाही. गुजरातमधील कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीच उसाला ४७०० रुपये दर दिला. उत्तर प्रदेशात यंदाची एसएपी ३२५० रुपये आहे. राजू शेट्टींसह शरद जोशीप्रणीत संघटनेचे अनिल घनवट एफआरपीवरच अडकले आहेत. शेट्टींनी एफआरपी अधिक मागितलेला दर एकदाही मिळालेला नाही. सरकार आणि कारखानदारांचे सर्व समर्थक आहेत. देशात, राज्यात कोणतेही सर्व सरकार कारखाने धार्जिणेच धोरण राबवते.

ते म्हणाले, की आम्ही जे ठरवतो तेच करतो. टनाला ४ हजार दर मिळाला नाही, तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू. त्याबाबत शरद जोशी व बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनी १२ डिसेंबरला सांगलीत संघटनेची परिषद होईल. राज्यभरातून पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यात पुढील लढ्याची घोषणा केली जाईल. सध्या उसाचे हवा सोड आंदोलन आहे. आम्ही उतरलो तर टायरची चाळणीच करतो.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...