`कोकणातील काजूला जीआय मानांकन द्या`

नुसतेच आश्‍वासन देणार नाही, तर त्याची पूर्तताही केली जाईल. रत्नागिरी किंवा कोकण काजू असा ब्रॅंड तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. प्रक्रिया केलेला काजू पॅकिंग करून पाठविण्यासाठी पॅकेजिंग हाउस आणि काजू प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यात सुरू करण्याचा विचार आहे. - प्रसाद लाड, आमदार.
`कोकणातील काजूला जीआय मानांकन द्या`
`कोकणातील काजूला जीआय मानांकन द्या`

रत्नागिरी : केरळच्या धर्तीवर राज्यात काजू बोर्ड स्थापन करावे, याशिवाय कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळावे, यासाठी जिल्ह्यातील काजू उद्योजकांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना साकडे घातले आहे. काजू व्यावसायिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन लाड यांनी शेतकऱ्यांना दिले.

काजू उत्पादकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यासाठी रत्नागिरीतील काजू उत्पादक आणि प्रक्रियादारांनी लाड यांची रत्नागिरी येथे भेट घेतली. या वेळी काजू उत्पादकांतर्फे जयवंत विचारे, धनंजय जाधव, प्रताप पवार, विवेक बरगिर, गोविंद चाळके, संदीप टिळेकर, मकरंद नागवेकर, गुरुप्रसाद, विराज घोसाळकर यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते.

काजू व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्याबरोबर बैठक घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही लाड यांनी सांगितले.

कोकणातील काजूला जीआय मानांकन मिळाले, तर चांगला दर मिळू शकेल. सिंधुदुर्गातील काजूला मानांकन दिले गेले असले, तरीही ते फक्त मर्यादित आहे. संपूर्ण कोकणासाठी मिळणे गरजेचे आहे. ११० ते १२० रुपये दर मिळाला पाहिजे, असे उत्पादकांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com