agriculture news in marathi Give ground water source strengthening proposal : Dr. Cahande | Agrowon

भूजल स्रोत बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर करा ः डॉ. चहांदे

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जानेवारी 2021

मनरेगाअंतर्गत स्रोत बळकटीकरणाच्या काही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी दिल्या.

पुणे ः पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण करताना तेथील स्थानिक भूस्तरीय व भौगोलिक रचना यांचा विचार करून स्रोत निरंतर शाश्‍वत राहील. या दृष्टीने स्रोत सापेक्ष बळकटीकरणाचे उपाय निश्‍चित करून राबविण्यात यावेत. यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजनेमध्ये सुधारणा करून मनरेगा योजनेअंतर्गत स्रोत बळकटीकरणाच्या काही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी दिल्या.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे स्रोत बळकटीकरण या विषयावर वेबिनार बुधवारी (ता. १३) आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चहांदे यांनी मार्गदर्शन केले. 

या वेबिनारमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, सहा विभागांतील नऊ भूवैज्ञानिक अधिकाची हनुमंत संगनोर, ऋषिराज गोस्की, मुश्ताक शेख, जीवन बेडवाल, रश्मी कदम, डॉ. मेघा देशमुख, संजय कराड, डॉ. वर्षा माने, डॉ. विजेता चौहान, क्वाडॅमचे कार्यकारी संचालक डॉ. हिमांशू कुलकर्णी, युनिसेफचे प्रतिनिधी आनंद घोडके, प्राइमूव्हचे प्रतिनिधी अजित फडणीस आदी उपस्थित होते. श्री. चहांदे म्हणाले, की स्रोत बळकटीकरण करणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याकरिता नवीन प्रस्ताव करण्यापूर्वी सर्व भूवैज्ञानिकांचे मुद्दे, अभिप्राय, सूचना घेण्यासाठी या वेबिनारचे आयोजन केले. हा निश्‍चितच चांगला उपक्रम आहे. 

स्रोत बळकटीकरणाची वेगळ्याने योजनाच करणे आवश्यक आहे. त्याकरिता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडील तांत्रिक ज्ञान, कौशल्य, डाटा बेस यांचा वापर करून स्रोत बळकटीकरणासाठी ज्या ज्या योजनांचा समावेश उपयुक्त वाटतो. त्या सर्व उपाययोजनांचा प्रस्तावात अंतर्भाव करावा. 
या योजनांकरिता वेगळ्याने निधी मिळण्याच्या दृष्टीने जुन्या शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या लेखाशीर्षची माहिती घेऊन निधीची उपलब्धतेची तरतुदी बाबतची पडताळणी करावी. संचालनालयातील संशोधन व विकास कक्षाचे प्रमुख डॉ. विजय पाखमोडे यांनी प्रास्ताविक केले. तर उपसंचालक माधवी दुबे यांनी आभार मानले.


इतर ताज्या घडामोडी
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पेच बीड : जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
‘सोलापूर, पुण्यात वन्यप्राणी हल्ला...सोलापूर ः ‘‘पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत...
अनवलीतील नीरा भाटघरच्या कॅनॉलची...सोलापूर ः ‘‘पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा...
‘पोकरा’तंर्गत योजनेत भाग घ्या ः देशमुखनांदेड : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
रखडलेल्या सूक्ष्म सिंचन फायलींचा मार्ग...अकोला ः गेल्या तीन वर्षांमध्ये प्रलंबित असलेले...
जवसाचे आरोग्यदायी महत्त्व जाणावे ः डॉ....अकोला ः शेतकऱ्यांनी जवसाचे उत्पन्न घेताना तेलाचा...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना...बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी...
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेवाची...नाशिक खामखेडा ता. देवळा : देवळा तालुक्यातील...
आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा...नगर : जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत...
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे...औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु....
पंढरपुरात माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-...पंढरपूर, जि. सोलापूर : माघवारी जया शुद्ध...
सीताफळ निर्यात वाढण्यासाठी तज्ज्ञांचे...बीड : केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ कृषी निर्यात...
पुसदमध्ये ‘पणन’ची कापूस खरेदी बंदआरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात सोमवार (ता....
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत...पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी...
काँग्रेस-राष्ट्रवादीचा सांगलीत ‘...सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे...
नियमित कांदा निर्यात सुरू राहण्यासाठी...नाशिक : जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. मात्र...
गारपीटग्रस्तांचे पंचनामे करा ः...नागपूर : कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची...