नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
ताज्या घडामोडी
भूजल स्रोत बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर करा ः डॉ. चहांदे
मनरेगाअंतर्गत स्रोत बळकटीकरणाच्या काही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी दिल्या.
पुणे ः पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण करताना तेथील स्थानिक भूस्तरीय व भौगोलिक रचना यांचा विचार करून स्रोत निरंतर शाश्वत राहील. या दृष्टीने स्रोत सापेक्ष बळकटीकरणाचे उपाय निश्चित करून राबविण्यात यावेत. यासाठी शिवकालीन पाणी साठवण योजनेमध्ये सुधारणा करून मनरेगा योजनेअंतर्गत स्रोत बळकटीकरणाच्या काही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी दिल्या.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे स्रोत बळकटीकरण या विषयावर वेबिनार बुधवारी (ता. १३) आयोजित करण्यात आला होता. या वेबिनारमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चहांदे यांनी मार्गदर्शन केले.
या वेबिनारमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, सहा विभागांतील नऊ भूवैज्ञानिक अधिकाची हनुमंत संगनोर, ऋषिराज गोस्की, मुश्ताक शेख, जीवन बेडवाल, रश्मी कदम, डॉ. मेघा देशमुख, संजय कराड, डॉ. वर्षा माने, डॉ. विजेता चौहान, क्वाडॅमचे कार्यकारी संचालक डॉ. हिमांशू कुलकर्णी, युनिसेफचे प्रतिनिधी आनंद घोडके, प्राइमूव्हचे प्रतिनिधी अजित फडणीस आदी उपस्थित होते. श्री. चहांदे म्हणाले, की स्रोत बळकटीकरण करणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याकरिता नवीन प्रस्ताव करण्यापूर्वी सर्व भूवैज्ञानिकांचे मुद्दे, अभिप्राय, सूचना घेण्यासाठी या वेबिनारचे आयोजन केले. हा निश्चितच चांगला उपक्रम आहे.
स्रोत बळकटीकरणाची वेगळ्याने योजनाच करणे आवश्यक आहे. त्याकरिता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडील तांत्रिक ज्ञान, कौशल्य, डाटा बेस यांचा वापर करून स्रोत बळकटीकरणासाठी ज्या ज्या योजनांचा समावेश उपयुक्त वाटतो. त्या सर्व उपाययोजनांचा प्रस्तावात अंतर्भाव करावा.
या योजनांकरिता वेगळ्याने निधी मिळण्याच्या दृष्टीने जुन्या शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या लेखाशीर्षची माहिती घेऊन निधीची उपलब्धतेची तरतुदी बाबतची पडताळणी करावी. संचालनालयातील संशोधन व विकास कक्षाचे प्रमुख डॉ. विजय पाखमोडे यांनी प्रास्ताविक केले. तर उपसंचालक माधवी दुबे यांनी आभार मानले.