agriculture news in marathi give information about karvand cultivation | Agrowon

..अशी करा करवंदाची लागवड

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

करवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. ते हलक्‍या, मुरमाड, तसेच कातळ असलेल्या जमिनीतही चांगले येते. करवंदाच्या जाती फळाच्या आणि गराच्या रंगावरून ठरविल्या जातात. विद्यापीठाने ‘कोकण करवंद बोल्ड’ नावाची नवीन जात प्रसारित केली आहे.

या जातीची फळे मोठी (१२-१६ ग्रॅम) व घोसाने लागतात, तसेच फळाची प्रत उत्कृष्ट आहे. फळे गोलाकार असून, गराचे प्रमाण ९२ टक्के आहे. फळांचा टिकाऊपणा चांगला आहे. फळे गडद काळ्या रंगाची असतात. कच्च्या व पक्व फळांपासून विविध प्रक्रिया केलेले टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.

कुंपणासाठी लागवड करताना दोन रोपांतील अंतर ९० ते १५० सें. मी. ठेवावे, सलग लागवड करताना तीन ते चार मीटर अंतरावर कलमे लावून लागवड करावी, लागवड केल्यावर कलमांना आधार द्यावा. लागवडीसाठी एप्रिल-मे महिन्यात ४५ x ४५ x ४५ सें.मी. आकाराचे खड्डे खणून माती, चांगले कुजलेले शेणखत (दोन किलो) आणि २०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर भरून ठेवावे.

कलम लावल्यानंतर हिवाळ्यात १५ दिवसांच्या अंतराने व उन्हाळ्यात आठवड्याच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या लागवडीच्या पहिल्या वर्षी द्याव्यात, म्हणजे कलमांची वाढ जोमदारपणे होईल. कलमांचे जगण्याचे प्रमाण वाढेल.

संपर्क : ०२३५८-२८०२३८
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

इतर प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची
शेतकरी नियोजन (पीक : कलिंगड)माझी गाढोदे (ता. जळगाव) येथे गिरणा, तापी नदीच्या...
शेतकरी नियोजन- पीक - डाळिंबशेतकरी- ः ज्ञानेश्‍वर वाघमोडे गाव ः चळे, ता....
शेतकरी नियोजन पीक ः केळीशेतकरी - प्रेमानंद हरी महाजन, तांदलवाडी, ता....
केळी सल्लामृग बागेतील केळी गर्भावस्थेत आहेत. कांदेबाग लागवड...
शेतकरी नियोजन ः पीक केळी----------------------- शेतकरी ः प्रेमानंद हरी...
तंत्र कारले लागवडीचे...साधारण कारल्याच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या...
वाढत्या थंडीचे फळबागांवरील परिणामगेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये वातावरणात बदल...
सुपिकतेसाठी माती परीक्षण गरजेचेमाती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे...
अशी करा काजू लागवड...पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनीत, जांभा...
..अशी करा करवंदाची लागवडकरवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत...
पंढरपुरी म्हैस : हलक्‍या चाऱ्यावर तग...पंढरपुरी म्हैस ही हलक्‍या चाऱ्यावर तग धरून...
फणस उत्पादनवाढीसाठी झाडाचे व्यवस्थापन...१) फणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
रताळे लागवडरताळे लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम...
शेवगा लागवड तंत्रज्ञानशेवगा लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येते. जेथे...
एरंडी लागवड तंत्रएरंडी लागवड हलक्‍या व मध्यम जमिनीवर जून ते...
फणस उत्पादनासाठी झाडाचे व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
नारळ बागेत मसाला पिकांची लागवड    नारळ बागेमध्ये नारळाच्या...
मोगरा लागवडमोगरा लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा निचरा...
ट्रायकोकार्ड, कामगंध सापळ्याचा कीड...कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा वापर...
पानवेल, लवंग, जायफळ, काजू लागवड कशी...पानवेल लागवड कशी करावी? - व्ही. के. देवकर,...