agriculture news in Marathi, Give an instant tanker if demand for bulldum: Goyal | Agrowon

बुलडाण्यात मागणी आल्यास तत्काळ टँकर द्या ः गोयल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण उभे राहिलेले आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा आहे. उपलब्ध असलेला हा पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. टँकरची मागणी आल्यास तत्काळ टँकर उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव श्यामकुमार गोयल यांनी केली.

बुलडाणा  : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट भीषण उभे राहिलेले आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा आहे. उपलब्ध असलेला हा पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. टँकरची मागणी आल्यास तत्काळ टँकर उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव श्यामकुमार गोयल यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा टंचाई परिस्थितीमधील उपाययोजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पालक सचिव आढावा घेताना बोलत होते. या प्रसंगी विभागीय आयुक्त पीयूष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश पारनाईक आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या आराखड्यातील मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही श्री. गोयल म्हणाले. टंचाई परिस्थितीत मंजूर कामांमधील विंधन विहिरीची कामे पूर्ण करण्याचे सांगत श्री. गोयल म्हणाले की, विंधन विहिरीवर डिझेल किंवा सौरपंप बसविण्यात येतील. पाणीपुरवठाविषयक कामांसाठी आचारसंहितेचे कुठलेही बंधन नाही. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देत कामे थांबवू नका. मागणी आल्यास तत्काळ पाणीपुरवठ्याचे टँकर मंजूर करावेत. टँकरवरील जीपीएस यंत्रणेचा नियमित गटविकास अधिकारी स्तरावर आढावा घेण्यात यावा. कंत्राटाप्रमाणे टँकरचालक फेऱ्या करीत आहेत किंवा नाही, याबाबत चाचपणी करावी. विहिरीवर शेतकऱ्यांची मिशनरी असल्यास अधिग्रहित विहिरीसाठी शेतकऱ्याला प्रतिदिवस ६०० रुपये अदा करण्यात येतात. तर, शेतकऱ्यांची मशिनरी नसल्यास प्रतिदिवस ४५० रुपये अदागयी करण्यात येते. जास्त पाणीउपसा होत असल्यास अधिग्रहित विहीर असलेल्या शेतकऱ्याला प्रतिलिटर १२ रुपयांप्रमाणे  देण्यात येते. 

चाराटंचाईबाबत आढावा घेताना श्री. गोयल म्हणाले की, मागणीनुसार चारा छावणी देण्यात यावी. चारा छावणी उभारण्यासाठी सादर झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रस्तावांचे अवलोकन करून अटींनुसार चारा छावणी देण्यात यावी. पूरक चाऱ्याचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे कामाची मागणी झाल्यास सेल्फवर असलेली कामे तत्काळ सुरू करावीत. कामांचा सेल्फ जुलैपर्यंतचे नियोजन लक्षात घेऊन करून ठेवावा. सध्या १७३७ कामांवर १० हजार ८३७ मजुरांची उपस्थिती आहे. सन २०१८ खरीप दुष्काळ अनुदान वाटप १०० टक्के करावे.

अशा आहेत टंचाईच्या उपाययोजना

  • विंधन विहिरी/कूपनलिका - ४२८ गावांमध्ये ५९१ प्रस्तावित 
  • २१५ गावांमधील २८३ कामांना मंजुरी, ११३ गावांमधील १५५ कामे पूर्ण 
  • नळ योजनांची विशेष दुरुस्ती ११० गावांत ११० कामे मंजूर, ३२ कामे पूर्ण 
  • तात्पुरत्या पूरक नळ योजना ५ गावांमध्ये पूर्ण 
  • २२६ गावांमध्ये २३८ टँकरने पाणीपुरवठा, २२७ गावांमध्ये ७२७ खासगी विहीर अधिग्रहण

 


इतर बातम्या
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...