नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या : पटोले

भंडारा : ‘‘मदतीचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये’’, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिले.
Give maximum benefits to the victims: Patole
Give maximum benefits to the victims: Patole

भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त लोकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. मदतीचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. एकही पात्र व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये’’, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिले. 

लाखनी येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार मलिक विराणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानतोडे, गटविकास अधिकारी जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे  व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे ऑगस्ट व ऑक्टोबरमध्ये लाखनी तालुक्यात ४ हजार ८३७ शेतकऱ्यांचे १७४३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी शासनाला प्रस्ताव पाठविला. भरपाईचा शासन आदेश निर्गमित झाला आहे. २ हेक्टरपर्यंत १८ ते २० हजारापर्यंत मदत देण्यात येईल. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. मदत वाटपाची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश नाना पटोले यांनी दिले.

त्याचप्रमाणे ५३७ अंशत: ९० मोठ्या प्रमाणात, तर १८ पूर्णतः: असे एकूण ६४५ घरांचे नुकसान झाले आहे. ७९ गोठ्यांचे सुद्धा नुकसान झाले. यासाठी ६१ लाख ४३ हजार १०० रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. पूर्णतः: घराचे नुकसान झालेल्या व्यक्तींना ९५ हजार १०० रुपये, तर अंशतः: घराचे नुकसान झालेल्या व्यतींना ६ हजार रुपये, असे भरीव सानुग्रह अनुदान देण्यात येईल. ही रक्कम तत्काळ खात्यात जमा करावी, अशा सूचना पटोले यांनी दिल्या.

वंचित शेतकरी, नुकसानग्रस्त व्यक्ती व पशुधन याचे पुन्हा सर्वे करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश पटोले यांनी दिले. हा अहवाल प्राप्त होताच मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com