कांद्याला किलोमागे पाच रुपये नुकसानभरपाई द्या : उत्पादक संघटना

Give the onion a loss of five rupees per kg
Give the onion a loss of five rupees per kg

नाशिक : कांद्याची निर्यात प्रक्रिया सुरू करण्याच्या कामात केंद्र सरकारने दिरंगाई केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्याची भरपाई म्हणून १ फेब्रुवारी ते १ मार्च २०२० दरम्यान विक्री होणाऱ्या कांद्याला नुकसान भरपाई म्हणून किलोमागे ५ रुपये भरपाई मिळावी. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले आहे. 

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी करून अगोदरच भारतीय कांदा उत्पादकांचे नुकसान केले आहे. आता शेतकऱ्यांच्या दबावामुळे निर्यातबंदी उठली; परंतु कांदा निर्यातबंदीसाठी १५ तारीख दिल्याने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करणारे सरकार दुटप्पी वागत आहे, असा आरोप केंद्र सरकारच्या धोरणावर करण्यात आलेला आहे. 

निवेदनाद्वारे नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, शैलेंद्र पाटील, शिवाजी पवार, राज्य संपर्कप्रमुख कुबेर जाधव, जयदीप भदाणे, संजय साठे, चंद्रकांत शेवाळे, विलास गांगुर्डे, विजय भोरकडे, भगवान जाधव यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com