Agriculture News in Marathi Give our village a Gram Panchayat Gram Panchayat! | Page 3 ||| Agrowon

आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या ग्रामपंचायत! 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या दोन्ही गावांना विशेष बाब म्हणून स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा किंवा नजीकच्या वघाळा ग्रामपंचायतमध्ये दोन्ही गावांचा समावेश करावा.

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या दोन्ही गावांना विशेष बाब म्हणून स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा किंवा नजीकच्या वघाळा ग्रामपंचायतमध्ये दोन्ही गावांचा समावेश करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आरमोरी पंचायत समितीसमोर चक्का जाम आंदोलन केले.

पंधरा दिवसांच्या आत या संदर्भात निर्णय न झाल्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. 

तत्कालीन गट ग्रामपंचायत औरसोडामधील परसोडा हे गाव फार मोदी नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु त्याच गट ग्रामपंचायतमधील रवी, मुल्लुरचक ही गावे नगरपरिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आली नाहीत.

तीन वर्षांपासून दोन्ही गावे कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत तसेच सदर दोन्ही गावांत कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. त्याचप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या योजना ग्रामपंचायती अभावी जनतेला मिळत नसून, दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर या गावाला ८०० ते ९०० लोकसंख्येच्या आधारावर स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्यात आला. त्याच धर्तीवर विशेष बाब म्हणून रवी व मुल्लरचक या गावांना ग्रामपंचायतींना दर्जा मिळावा, किंवा जवळच्या वाघाळा ग्रामपंचायतीमध्ये ही दोन्ही गावे समाविष्ट करण्यात यावी या मागणीसाठी नायब तहसीलदार चापले यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्‍वास भोवते, आदिवासी काँग्रेस सेलचे सचिव दिलीप घोडाम, पंचायत समिती सदस्य वृंदा गजभिये, नगरसेवक माणिक भोयर, सुरेश मरापा, विठोबा कामठे, राजकुमार नंदर्धने, शामराव शिलार या वेळी उपस्थित होते. 

दोन्ही गावे झाली निराधार 
गेल्या तीन वर्षांपासून कोणत्याही ग्रामपंचायत अंतर्गत समावेश नसल्याने रवी व मुलुरचक ही दोन्ही गावे निराधार झाली आहेत. परिणामी गावात कोणतेही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
 


इतर बातम्या
जागतिक बाजारपेठेत कच्च्या  साखरेच्या...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत कच्च्या साखरेच्या...
आखाती देशातून आले धुळीचे वादळ पुणे : आखाती देशातून वाहणारे धुळीचे वादळ...
इंडोनेशिया पामतेल  निर्यात कमी करणार पुणे ः जागतिक पातळीवर खाद्यतेलाची मागणी वाढल्याने...
कार्बन कमी करण्यासाठी  बांबू लागवड हाच...पुणे ः पृथ्वीवरील कार्बनचे वाढते प्रमाण ही गंभीर...
पतपुरवठा सोसायट्यांसाठी  शिखर बॅंकेचे...पुणे ः राज्याच्या कृषी पतपुरवठा व्यवस्थेत मोलाची...
सरकारच्या उपाययोजनांनंतरही  शेतकरी...नागपूर : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच...
आत्महत्या नियंत्रणासाठी धोरणात्मक...चंद्रपूर : शेतकऱ्यांना स्वावलंबी करुन पाठबळ...
सीड पार्कचा प्रकल्प आराखडा तयार नागपूर : दर्जेदार बियाणेनिर्मिती सोबतच बियाणे...
जैव उत्तेजक उत्पादने  नोंदणीचा घोळात...पुणे ः राज्यातील जैव उत्तेजकांच्या यादीतील...
कृषी योजनांसाठी अर्जांचा ओघ सुरुचनगर ः कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, सिंचन साधने व...
निर्यातीसाठी गुणवत्तापूर्ण  हळद...हिंगोली ः हळद निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा...
पशुसंवर्धन विभागाची यंत्रणाच आजारी अमरावती : सरकारकडून शेतीपूरक पशुपालनासाठी...
काजूला हमीभाव देण्याबाबत  प्रयत्न...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील काजू...
पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या उरकल्यापुणे : गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार...
औरंगाबाद दूध संघावर एकता पॅनेलचे...औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध संघाच्या सात...
गेली आठ वर्षे सर्वाधिक उष्ण, त्यात २०२१...पृथ्वीचे २०२१ मधील पृष्ठभागाचे जागतिक सरासरी...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...