शेतमजुरांना पेंशन द्या : जनता दल

शेतमजुरांना पेंशन द्या : जनता दल
शेतमजुरांना पेंशन द्या : जनता दल

अमरावती : शेतकरी, शेतमजूर, मच्छीमारांसह अन्य कष्टकऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये पेंशन द्यावी, अशा मागणीचे निवेदन जनता दल (सेक्‍युलरचे) जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे यांच्या नेतृत्वात येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

देशाच्या पोशिंद्याला वयाची ६० वर्ष पार केल्यानंतर सरकारने निवृत्ती वेतन द्यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून जनता दलाने लावून धरली आहे. लोकप्रतिनिधी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना पेंशनच्या माध्यमातून संरक्षण देण्याचे धोरण आहे. तरीही शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांना अशाप्रकारचे कोणतेही संरक्षण आजवर दिले गेले नाही. अशा कुटूंबातील कर्ता व्यक्‍ती गेल्यानंतर अशा कुटूंबाची वाताहात होते. परिणामी, अशा सर्वाधिक गरजू व्यक्‍तींना पेंशन दिली जावे, अशी मागणी आहे. 

संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थींना अवघे सहाशे रुपये उदरनिर्वाहासाठी दिले जातात. ६०० रुपयांत गुजराण शक्‍य नाही. परिणामी यात वाढ करावी, अशीही मागणी करण्यात आली. जनता दल (सेक्‍युलर)चे जिल्हाध्यक्ष गौरव सव्वालाखे, माजी नगरसेवक हुसेन, तालुकाध्यक्ष धर्मराज वरघट, आम आदमी पार्टीचे नितीन गवळी, संजय डगवार, डॉ. उत्तम पडोळे यांचा निवेदनकर्त्यांमध्ये समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com