agriculture news in Marathi give permission for cotton seed sell from 20th May Maharashtra | Agrowon

कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘माफदा’

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या राज्यातून मान्यताप्राप्त नसलेल्या कंपन्यांचे अनधिकृत बियाणे थेट विकले जाते. 

नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या राज्यातून मान्यताप्राप्त नसलेल्या कंपन्यांचे अनधिकृत बियाणे थेट विकले जाते. त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता पाहता बीटी कापूस बियाणे विक्रीसाठी गुरुवारपासून (ता.२०) पासून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ‘माफदा’ने केली आहे. 

महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड डीलर असोसिएशनने (माफदा) कृषिमंत्री दादा भुसे यांना विविध १४ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, कृषी विभागाने कंपनी ते वितरक यांना सोमवारी (ता.१०), वितरक ते किरकोळ विक्रेता यांना शनिवार (ता. १५), तर किरकोळ विक्रेते एक जून रोजी शेतकऱ्यांना बियाणे विक्री करतील.

परंतु त्यापूर्वीच अनधिकृत बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. गेल्या अनेक वर्षांचा तसा अनुभव देखील आहे. त्यामुळे अधिकृत बियाणे विक्रीसाठी मे महिन्यात परवानगी देण्यात यावी. कृषी विभागाच्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणनियंत्रण समित्यांमध्ये ‘माफदा’च्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी. 

परवानाधारक विक्रेत्याचे निधन झाल्यास त्याच्या परवान्याचे हस्तांतर वारसास व्हावे. विक्रीस मनाई केलेली कीटकनाशके तसेच मुदतबाह्य कीटकनाशके नष्ट करण्याची यंत्रणा कृषी विक्रेत्यांकडे नाही. त्यासाठी उत्पादक कंपन्यांना अशी उत्पादने परत घेत नष्ट करण्याच्या कारवाईबाबत शासन स्तरावरून आदेश देण्यात यावे. बियाणे सॅम्पलच्या थकीत रकमेचा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर तोडगा निघावा. असोसिएशनचे महासचिव विपिन कासलीवाल, अध्यक्ष विनोद तराळ यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे. 

‘माफदा’च्या मागण्या 

  • कृषी सेवा केंद्रे दिवसभर सुरू करावीत 
  • कोरोनामुळे ‘ई-पॉस’वरून विक्रीला स्थगिती द्यावी 
  • सीलबंद बियाणे फेल गेल्यास विक्रत्यांवर कारवाई न करता त्यांना साक्षीदार समजावे 
  • सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी आल्यास बाजू मांडण्याची संधी द्यावी 
  • कोरोनामुळे संगणकीय पद्धतीने ठेवलेले स्टॉक रजिस्टर मान्य करा 

खताच्या किमती कमी करा 
रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना कमिशन ही कमी प्रमाणात मिळेल. अत्यल्प कमिशनमध्ये गोदाम भाडे, दुकानातील कर्मचाऱ्यांचे पगार, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज, वाहतूक, हमाली याचा खर्च भागत नाही. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील यामुळे वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता खताच्या किमती कमी करण्यासाठी शासनस्तरावर कारवाई व्हावी, तसेच सर्व विक्रेत्यांना युरिया पोहोच सुविधा मिळावी.  


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...